प्रेषित मोहम्मदाचा अवमान? इंजिनिअरिंग विद्यार्थ्याचा बस कंडक्टरवर चाकूहल्ला

आरोपीने व्हिडिओ बनवला

प्रेषित मोहम्मदाचा अवमान? इंजिनिअरिंग विद्यार्थ्याचा बस कंडक्टरवर चाकूहल्ला

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील एका २० वर्षीय तरुणाने बसकंडक्टरशी तिकिटारून झालेल्या वादातून चाकूहल्ला केल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. या आरोपीने नंतर व्हिडीओ तयार करून कंडक्टरने प्रेषित मोहम्मदाचा अवमान केल्यामुळे आपण हा हल्ला केल्याचा दावा केला आहे.

आरोपीचे नाव लारेब हाश्मी (२०) असे असून त्याचा बस कंडक्टर हृषिकेश विश्वकर्मा (२४) याच्याशी वाद झाला होता. हाश्मी हा इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याने विश्वकर्मावर चाकूहल्ला करून पलायन केले होते. तो पोलिसांच्या तावडीतूनही पळण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पोलिसांनी चकमकीत त्याच्या पायावर गोळी झाडली आणि तो पकडला गेला.

ही घटना शुक्रवारी सकाळी घडल्याचे प्रयागराज पोलिसांनी सांगितले. हाश्मी आणि बसकंडक्टर विश्वकर्मा यांच्यात तिकीटदरावरून वाद झाला. त्यानंतर हाश्मीने विश्वकर्मावर चाकूने वार केला. विश्वकर्मा याच्या मानेवर आणि शरीराच्या अन्य भागांवर जखमा झाल्या आहेत. त्यानंतर हाश्मी याने बसमधून उडी मारून पलायन केले होते. त्यानंतर तो कॉलेज कॅम्पसमध्ये लपला होता. कॉलेजमध्ये लपला असतानाच हाश्मी याने व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर टाकला. त्यात त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

हे ही वाचा:

अंतरवली सराटीमधील दगडफेकीच्या घटनेतील मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

बदनामीची धमकी देत माजी सैनिकाकडून पावणेचार लाख रुपये उकळले

गाडीमध्येच गोळ्या झाडलेल्या भारतीय तरुणाचा अमेरिकेत मृत्यू!

‘पंतप्रधान मोदी यांनी धीर दिल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला’

बस कंडक्टरने प्रेषित मोहम्मदांचा अवमान केल्यामुळे हा हल्ला केल्याचा दावा त्याने केला. या व्हिडीओत तो चाकूही दाखवत आहे, ज्याचा वापर त्याने कंडक्टरवर हल्ला करताना केला होता. या व्हिडीओत तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे नाव घेतानाही दिसत आहे. तर, बसमध्ये घेतल्या गेलेल्या व्हिडीओत हाश्मी हातात चाकू घेऊन बसमधून पळून जात असल्याचे दिसत आहे. विश्वकर्मा याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर तत्काळ प्रयागराज पोलिसांनी कॉलेज कॅम्पस गाठून त्याला अटक केली.

Exit mobile version