नोएडातील एका हॉटेलमध्ये फील्ड इंजिनियर मोहित कुमार (मूळगाव औरैया, उत्तर प्रदेश) यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांच्या मानसिक छळामुळे आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड करून आपल्या वेदना जगापुढे मांडल्या.
“तुम्हाला हा व्हिडीओ मिळेपर्यंत मी या जगात नसेन. पुरुषांसाठी जर काही कायदा असता, तर कदाचित मी हे पाऊल उचललं नसतं. आई-बाबा, मला माफ करा., अशा शब्दांत त्याने आपली व्यथा मांडली आहे.
मोहित आणि प्रिया यादव यांचं ७ वर्षांचं नातं विवाहात परावर्तित झालं. विवाहानंतर काही काळ सगळं सुरळीत होतं, पण प्रिया बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस लागल्यावर वागणुकीत फरक पडला. मोहितच्या कुटुंबीयांच्या मते, प्रिया आई व भावाच्या प्रभावाखाली मोहितचा मानसिक छळ करत होती.
मोहितच्या म्हणण्यानुसार, पत्नीच्या आईने जबरदस्तीने गर्भपात घडवून आणला. दागिने व साड्या सासरी नेण्यात आल्या. प्रॉपर्टी सासरच्या नावे न केल्यास खोट्या हुंडाबळी प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आली. हे सगळं सहन न होऊन, मोहितने आत्महत्या केली.
हे ही वाचा:
चिकूमुळे हाडं होतात मजबूत, कमजोरीही राहते दूर
चालत्या गाडीत बलात्काराला विरोध केल्याने ब्युटीशियनची हत्या!
तस्लिमा नसरीन संतापल्या, मोहम्मद युनूसना हाकला!
जॉली हॉटेल, नोएडा (रूम क्र. १०५) मधून मोहितचा मृतदेह सापडला. पोलिस अधीक्षक अभयनाथ त्रिपाठी यांनी प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं सांगितलं. मृतदेह पोस्टमॉर्टमनंतर कुटुंबाला सोपवण्यात आला आणि औरैयामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले.
मोहितचा भाऊ तरण प्रताप म्हणतो: “विवाहानंतर प्रिया भावंडांपासून मोहितला वेगळं करत होती. तिचं कुटुंब सतत प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याची मागणी करत होतं. त्यांच्या धमक्यांमुळेच मोहितने आत्महत्येचा निर्णय घेतला.”