लाच घेताना ईडी अधिकारीच अडकला एसीबीच्या जाळ्यात!

१५ लाख रुपयांची लाच घेताना एका ईडी अधिकाऱ्यांसह त्याच्या साथीदाराला केले अटक

लाच घेताना ईडी अधिकारीच अडकला एसीबीच्या जाळ्यात!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने लाच घेतल्याप्रकरणी ईडी अधिकारी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.इंफाळमध्ये नियुक्त केलेल्या ईडी अधिकारी व त्याच्या साथीदाराला १५ लाखांची लाच घेताना राजस्थान एसीबीने रंगेहाथ पकडले आहे.नवल किशोर मीणा असे अटक करण्यात आलेल्या ईडी अधिकाऱ्याचे नाव आहे.

बेहिशेबी मालमत्ता आणि घोटाळ्यांचा तपास करण्यासाठी ईडी ही केंद्रसरकारची तपास यंत्रणा संपूर्ण भारतात काम करते.अनेक नेत्यांच्या घरावर धाडी टाकून कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात येते.मात्र, एक ईडी अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुरुवारी नवल किशोर मीणा या ईडी अधिकाऱ्याला १५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडत अटक केलीय आहे.आरोपी नवल किशोर मीणा याच्यासोबत त्याचा सहकारी बाबुलाल मीणा याला देखील एसीबी पथकाकडून अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

महुआ मोईत्रा यांच्या संसद खात्यावरून दुबईतून ४७ वेळा लॉग इन

शिवाजी पार्क प्राणी संग्रहालयातून प्राणी झाले गायब!

मराठा आरक्षणामुळे संभाजीनगरातील आठ आगाराच्या एसटी बस जागेवरच!

केजरीवाल ईडी चौकशीला जाणार नाहीत

फिर्यादीनुसार नवल किशोर मीणा आणि बाबूलाल मीणा यांनी मणिपूरमधून चिटफंड प्रकरणात लाच घेतल्याचा त्यांच्यावरआरोप आहे.याबाबत राजस्थान एसीबीकडून एक अधिकृत निवेदन जारी केले आहे.या निवेदनात एसीबीने म्हटले आहे की, अटक करण्यात आलेला ईडी अधिकारी हा खटला फेटाळणे, अटक न करणे आणि मालमत्ता जप्त करण्याच्या बदल्यात ही लाच घेत असे.सुरुवातीला १७ लाख रुपयांची लाच मागितली होती, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणाच्या संदर्भात राजस्थान एसीबीने राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

 

 

Exit mobile version