दिल्लीतील जहांगीरपुरी भागात करण्यात आलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात असला तरी इथे अतिक्रमण झाले आहे हे सर्वोच्च न्यायालयात सगळ्याच वकिलांनी मान्य केले. फक्त त्यावर कारवाई करताना नोटीस पाठवायला हवी होती, अशी अनेक अनधिकृत बांधकामे दिल्लीत आहेत तिथेही कारवाई करा, ही एका ठराविक धर्मियांविरोधात केलेली कारवाई आहे, असे युक्तिवाद मात्र केले गेले. शेवटी न्यायालयाने आहे तशी परिस्थिती ठेवण्याचे आदेश देत ही कारवाई थांबविली आहे. दिल्लीतील जहांगिरपुरी या भागात हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवरून दगडफेक, हाणामारी, गोळीबार झाला आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही अतिक्रमणविरोधी कारवाई झाल्यामुळे ती फक्त काही मुस्लिम कुटुंबांच्या बांधकामांवर करण्यात आली असा दावा करण्यात आला.
न्यायालयात यासंदर्भात जमियत उलेमा ई हिंद या संघटनेने या कारवाई झालेल्या लोकांच्या वतीने याचिका केली.
या याचिकादारांचे आणखी एक वकील दुष्यंत दवे यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, हे केवळ एका ठराविक धर्मियांविरोधात होत आहे. याच भागात मिरवणूक निघाली होती, तिला परवानगीही नव्हती. त्यावर न्यायाधीशांनी म्हटले की, त्याचा या कारवाईशी कोणताही संबंध नाही.
तेव्हा दुष्यंत दवे म्हणाले की, अशी १७३१ अनधिकृत बांधकामे दिल्लीत आहेत. त्यात ५ कोटी लोक त्यात राहतात. (खरे तर दिल्लीची लोकसंख्या जवळपास २ कोटी आहे.) तुम्ही दक्षिण दिल्लीतील सुखसोयींनी युक्त अशा स्थितीतील कॉलनीवरही कारवाई केली पाहिजे.
त्यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, जहांगीरपुरीचा विचार करता इथे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे. ते हटविले पाहिजे. जानेवारीतच या कारवाईला सुरुवात झाली होती. फेब्रुवारी, मार्च आणि आता एप्रिलमध्येही ही कारवाई सुरू आहे. रस्ते आणि पदपथावर ही अतिक्रमणे आहेत आणि ती हटविली पाहिजेत. काही इमारतीही अनधिकृत पद्धतीने उभ्या राहिल्या आहेत. मुस्लिमांच्या बांधकामांवरच कारवाई झाली या याचिकादारांच्या वकिलाच्या युक्तिवादावर मेहता म्हणाले की, हे आरोप निराधार आहेत. अशा कारवाईच्या वेळेला नेहमीच असे प्रकार घडतात. ज्यांच्यावर अन्याय झाला त्याऐवजी काही संघटना याचिका करतात. त्यामुळे एकूणच सगळे चित्र बदलून जाते. मध्य प्रदेशातही अशी कारवाई झाली त्यात सर्वाधिक बांधकाम हिंदूंचे तोडण्यात आले होते.
हे ही वाचा:
अबब! मविआच्या मंत्र्यांनी स्वतःवरील उपचारासाठी किती खर्च केला बघा?
खंडणी मागणारी धनंजय मुंडे यांची मेहुणी
…म्हणून अक्षय कुमारने मागीतली चाहत्यांची माफी
दिल्लीत भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या
यावर याचिकादारांच्या वतीने उभे राहिलेले प्रतिष्ठित वकील आणि काँग्रेसचे नेते कपिल सिबल यांनी हे अतिक्रमण कोणत्याही एका धार्मिक समुदायाविरोधात केलेले नाही, असे म्हटले मात्र ही कारवाई थांबवावी अशी विनंतीही केली. बुलडोझर वापरून अशी कारवाई होऊ नये असे ते म्हणाले.