चकमक फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला जन्मठेप

लखनभैया बनावट एन्काऊंटर प्रकरण

चकमक फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला जन्मठेप

चकमक फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना११ नोव्हेंबर २००६ मध्ये झालेल्या लखनभैया बनावट चकमक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शर्मा यांची या प्रकरणात स्थानिक न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, मात्र उच्च न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्ततेचा आदेश रद्द करून शर्मा यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने शर्माला तीन आठवड्यात ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहे.

वर्सोवा येथील नाना नानी पार्क येथे ११ नोव्हेंबर २००६ मध्ये कथित गुंड लखन भैया याला पोलीस चकमकीत ठार मारण्यात आले होते.परंतु लखन भैयाचे वकील बंधू याने न्यायालयात या चकमकिला आव्हान देत ही चकमक खोटी असून लखन भैयाची हत्या करण्यात आल्याची याचिका न्यायालयात दाखल केली होती.

हे ही वाचा:

सर्फराज, ध्रुव जुरेलची कोटी उड्डाणे

टक्केवारीवाले यजमान चोरांचे स्नेहसंमेलन…

गरिबांचे धर्मांतर करण्याचा गाझियाबादमध्ये प्रकार

पाकिस्तानच्या पीएसएलचे बक्षीस महिला आयपीएलपेक्षाही कमी

या प्रकरणात न्यायालयाने चकमक फेम प्रदीप शर्मा सह १३ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले होते. कथित गुंड लखन भैय्याला गोळ्या घालून ठार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने १२ जुलै २०१३ रोजी १३ पोलिस कर्मचाऱ्यांसह २१ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात न्यायालयाने शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली होती.

शर्मा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर लखन भैय्या याचे वकील बंधू यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे याबाबत दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने ट्रायल न्यायालयाला शर्मा विरुद्ध ठोस पुरावे आढळून आलेले नव्हते, परंतु त्याच्या विरुद्ध असलेल्या ठोस पुराव्यावरून उच्च न्यायालयाने शर्मा यांची या खटल्यातील निर्दोषता रद्द करून या हत्येत शर्माला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तीन आठवड्यात प्रदीप शर्मा यांना ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Exit mobile version