एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस इन्स्पेक्टर दया नायक यांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मुंबई पोलिस दलातील काही बदल्यामुळे दया नायक यांच्याकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.
दया नायक यांची मुंबई पोलीस दलात वापसी झाली आहे. मागील काही वर्षे दहशतवाद विरोधी पथकात असणारे पोलीस निरीक्षक दया नायक यांची मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत. नायक यांच्यासह काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत.
९०च्या दशकात गुंडांना यमसदनी पाठवणारे मुंबई पोलीस दलातील अधिकारी दया नायक यांची राज्य शासनाने मुंबई पोलीस दलात बदली केली आहे.
दया नायक यांच्या मुंबई पोलीस दलात करण्यात आलेल्या बदलीनंतर त्यांना गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाचा भार सोपविण्यात येणार असल्याची माहिती सूत्राकडून समजते.
हे ही वाचा:
मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांसह मुश्रीफ यांच्याविरोधात अवमान याचिका
देशात चर्चा असलेल्या गुंड अतीक अहमदला आज काय शिक्षा होणार? फाशीची मागणी
राम सेतूला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करा!
उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात ‘कांदे’ पाणी आणतील!
दया नायक यांच्यासहित दहशतवाद विरोधी पथकात असणारे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ आणि इतर ६ अधिकाऱ्यांच्या बदल्या तर काहींचे बदली आदेश रद्द करण्यात आले आहेत.
२०२१मध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्याकांडानंतर दया नायक यांची बदली गोंदिया येथे करण्यात आली होती. प्रशासकीय बदलीचे कारण त्यावेळी सांगण्यात आले होते. पण दया नायक यांनी या बदलीला आव्हान दिले होते. मॅटकडे त्यांनी दाद मागितली होती. मॅटने या बदली आदेशाला स्थगितीही दिली होती. त्यानंतर दया नायक एटीएसमध्ये रुजू झाले. ज्या पोलिस अधिकाऱ्यांची बदली रद्द करण्यात आली आहे त्यात नगिन काळे, कैलास बोंद्रे, रमेश यादव, अशोक उगले, मुरलीधर करपे यांचा समावेश आहे.
दया नायक १९९५मध्ये उपनिरीक्षक म्हणून सेवेत आले. प्रदीप शर्मा यांच्यासोबत त्यांनी गुन्हे अन्वेषण विभागात काम सुरू केले. १९९६मध्ये त्यांनी पहिला एन्काऊंटर केला. त्यानंतर ८०-९० एन्काऊंटर त्यांनी केले. त्यामुळे एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची एक वेगळी ओळख तयार झाली. त्यानंतर २००६मध्ये अंडरवर्ल्डशी संबंध आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणावरून त्यांना निलंबित करण्यात आले होते. पण त्याचे पुरावे सादर न करता आल्याने त्यांना क्लिन चीट मिळाली.