गडचिरोलीत सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार!

चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांपैकी एक नक्षलवादी २०१९ च्या जांभूळखेडा स्फोटात होता सामील

गडचिरोलीत सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार!

महाराष्ट्रातील गडचिरोली येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये काल १४ डिसेंबर रोजी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. चकमकीत ठार झालेल्या दोन नक्षलवाद्यांपैकी एक नक्षलवाद्याचा २०१९ च्या जांभूळखेडा स्फोटात सहभाग होता.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत मारले गेलेले दोन नक्षलवादी. त्यापैकी एक होता कसनसूर दलमचा (पथक) उपकमांडर दुर्गेश वट्टी.नक्षलवादी दुर्गेश वट्टी हा २०१९ मध्ये जांभूळखेडा बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार होता.या स्फोटात गडचिरोली पोलिसांचे १५ पोलीस शहीद झाले होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, छत्तीसगड सीमेवरील गोडलवाही चौकीजवळील बोधिनटोलाजवळ नक्षलवाद्यांचा एक मोठा गट तोडफोड करण्याच्या आणि पोलीस दलावर हल्ला करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

हे ही वाचा:

अबब! स्विगीकडून त्याने वर्षभरात मागवले ४२ लाखांचे पदार्थ!

ठाण्यातील तरुण अडकला होता हनीट्रॅपमध्ये, पाक तरुणींच्या आला होता संपर्कात

४७ वर्षांचा अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका

संसद घुसखोरी प्रकरणातील मास्टरमाईंड ललित झा शरण

ते म्हणाले की, शोध मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. सुमारे तासभर चाललेला गोळीबार संपल्यानंतर घटनास्थळी वट्टी आणि आणखी एका पुरुष नक्षलवाद्याचे मृतदेह सापडल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून एके-४७ आणि सेल्फ लोडिंग रायफल (एसएलआर) जप्त करण्यात आली आहे. परिसरात पुढील शोध सुरू असल्याचे एसपी म्हणाले.

दरम्यान, अलीकडेच छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साईंच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीपूर्वी नक्षलवादी हल्ला झाला होता. नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला, तर दुसरा जखमी झाला. नारायणपूरच्या आमदई खाणीत नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. नक्षलवाद्यांनी येथे आयईडी पेरली होती.या हल्ल्यात सीएएफ ९व्या बिएन बटालियनचे सैनिक कॉन्स्टेबल कमलेश साहू शहीद झाले. तर हवालदार विनय कुमार साहू जखमी झाले आहेत. एसपी पुष्कर शर्मा यांनी या हल्ल्याची माहिती दिली होती.

यापूर्वी सोमवारी सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला होता. यामध्ये दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. किस्टाराम पोलीस स्टेशन परिसरात हा स्फोट झाला. येथे सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक रस्ते बांधणीच्या कामाला सुरक्षा देण्यासाठी गस्त घालत होते. त्यानंतर हा स्फोट झाला होता.

Exit mobile version