चकमकफेक माजी पोलीस अधिकारी आणि प्रदीप शर्मा यांच्या घरावर गुरुवारी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली.कर चुकवेगिरी प्रकरणात ही छापेमारी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. एका माजी आमदारावर उत्तर प्रदेशात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भात ही छापेमारी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.
मनसुख हिरेन हत्या आणि अंटालिया बॉम्ब प्रकरणात नुकतेच जामिनावर बाहेर आलेले चकमक फेम माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पवई हिरानंदानी एव्हरेस्ट हाईट या इमारतीत असणाऱ्या घरावर आयकर विभागा कडून गुरुवारी छापे टाकण्यात येत आहे. अंधेरी पूर्व येथे राहणारे शर्मा हे पवई येथे सध्या राहण्यास आहे. पोलीस खात्यातून सेवानिवृत्ती नंतर प्रदीप शर्मा हे पी.एस फाउंडेशन ही गैरसरकारी संस्था चालवीत आहे. त्यांच्या संस्थेचे कार्यालय अंधेरी पूर्व येथे असून प्रदीप शर्मा हे पवई हिरानंदानी येथील एव्हरेस्ट हाईट येथे कुटुंबासह राहण्यास आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राहुल गांधींनी पुन्हा जात काढली
आपकडून आसाममध्ये तीन उमेदवार जाहीर
नवजात अर्भकाला वाचवणाऱ्या कार्यकर्त्यांचा भातखळकारांकडून गौरव
अमेरिकेचा बगदादमध्ये ड्रोनहल्ला इराणसमर्थक दहशतवादी कमांडरसह तिघांचा मृत्यू
तसेच माजी आमदार घनश्याम दुबे यांच्या अंधेरी येथील घरी आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे, त्याच बरोबर एका आयएएस अधिकारी यांच्याकडे याबाबत चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माजी आमदार आणि व्यापारी घनश्याम दुबे यांच्यावर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेश पोलिसांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
उत्तर प्रदेशातील भदोही येथील रहिवासी असलेले दुबे, त्याचा चालक हरी प्रसाद आणि भदोही तहसीलचे माजी उपनिबंधक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात ही आयकर विभागाची कारवाई असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुबे आणि शर्मा यांचे व्यवसायिक सबंध असल्याची समजते.
प्रदीप शर्मा यांना मनसुख हिरेन आणि अंटालिया बॉम्ब प्रकरणात अटक करण्यात आली होती. एनआयए ही अटक केली होती, दोन वर्षांनी शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे.