पुलवामामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; शोध मोहीम सुरू

नेहामा भागात दहशतवादी लपल्याची माहिती

पुलवामामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; शोध मोहीम सुरू

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सोमवार, ३ जून रोजी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे एक दिवस आधीच ही चकमक सुरू झाल्यामुळे गोंधळ उडाला आहे.

सुरक्षा दलांना पुलवामा येथील नेहामा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. याचं आधारे सुरक्षा दल आणि पोलिसांनी याठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर पोलीस, सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू झाली.

हे ही वाचा:

मध्य प्रदेशमध्ये वऱ्हाडाचा ट्रॅक्टर उलटून अपघात; १३ जणांचा मृत्यू

अजबच! उष्म्यामुळे चोर एसी लावून झोपला, पकडला गेला!

रविना टंडनला लोकांनी घेरले, तिच्या वाहनचालकाने धडक दिल्यामुळे झाला राडा!

नकली यूट्यूब पत्रकार रोज मोदी सरकारच्या नावाने खडे फोडतात

पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती काश्‍मीर पोलिसांनी सोमवार, ३ जून रोजी सकाळी सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून दिली आहे. पुलवामा जिल्ह्यातील नेहामा भागात चकमक सुरू झाली. पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. तत्पूर्वी, कुपवाडा येथे भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि युद्धसामग्रीचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता.

Exit mobile version