जम्मू- काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. कुपवाडा येथील मार्गी, लोलाब या सामान्य भागात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने बुधवारी सकाळी दिली.
मंगळावर, ५ नोव्हेंबर रोजी मिळालेल्या दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत गुप्त माहितीच्या आधारे भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी मार्गी, लोलाब, कुपवाडा या सामान्य वस्तीच्या भागात एक संयुक्त ऑपरेशन सुरू केले. यावेळी दहशतवाद्यांशी संपर्क स्थापित झाला आणि समोरून करण्यात आला. यानंतर ही चकमक सुरू झाली असून अद्यापही शोध मोहीम राबवण्यात येत आहे. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने यासंदर्भात माहिती दिली आहे.
दुसऱ्या एका घडामोडीत, बांदीपोरामधील कैतसान येथे सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. यानंतर याभागात पुढील कारवाई सुरू आहे, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सकाळी सांगितले. याआधी मंगळवारी भारतीय लष्कराने एक संयुक्त ऑपरेशन सुरू केले. बांदीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू झाली. सामान्य वस्तीच्या भागाजवळील कैतसान जंगलात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्तचर माहितीच्या आधारे, भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांनी संयुक्त ऑपरेशन सुरू केले. संपर्क स्थापित केला गेला आणि गोळीबार झाला.
हे ही वाचा:
‘गादी’वान झाले ताटाखालचं मांजर; मग अपमान होणारच ना ?
सरकार प्रत्येक खासगी मालमत्ता ताब्यात घेऊ शकत नाही
दिल्लीतील हवेची गुणवत्ता घसरली पराली जाळल्यामुळे आणि गाड्यांच्या धुरामुळे
‘औरंगजेबाने देशाला लुटले आणि मंत्री आलमगीरने झारखंडला लुटले’
यापूर्वी २ नोव्हेंबर रोजी जम्मू- काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवादी मारले होते. हलकन गली परिसरात सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केल्यानंतर ही चकमक सुरू झाली. २९ ऑक्टोबर रोजी सुरक्षा दलांनी अखनूरमध्ये एका मोठ्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीर २० ऑक्टोबर रोजी, गंदरबल जिल्ह्यातील श्रीनगर- लेह राष्ट्रीय महामार्गावरील बोगदा बांधण्याच्या जागेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक डॉक्टर आणि सहा बांधकाम कामगार ठार झाले होते.