जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

परिसरात शोध मोहिमेला सुरुवात

जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलामध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर गोळीबार करत पळ काढला आहे. सध्या या भागात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली जात आहे. सुदैवाने लष्कराच्या बाजूने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

जम्मू आणि काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, अशी माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी शनिवार, २ ऑक्टोबर रोजी दिली आहे. एक्स वरील एका पोस्टमध्ये भारतीय लष्कराने शनिवारी सांगितले की, दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केला आणि जंगलात पळ काढला.

बांदीपोरा येथील पनार भागात १ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री उशिरा गस्तीवर असलेल्या जवानांनी संशयास्पद हालचाली पाहिल्या. या हालचाली र्ख्ण्याचे आव्हान देताच समोरच्या बाजूने अचानक गोळीबार करण्यात आला. सुरक्षा दलाचे जवान जवळ येताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि जंगलात पळ काढला. सध्या या परिसरात शोध मोहीम सुरू आहे.

हे ही वाचा:

लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या प्रत्यापर्पणाची प्रक्रिया सुरू

दिवाळीच्या रोषणाईला विरोध करणाऱ्या तळोजामधील इमारतीला नितेश राणेंनी दिली भेट

बलुचिस्तानमध्ये स्फोट; शाळकरी मुलांसह पाच जणांचा मृत्यू

‘अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर शरद पवार, उद्धव ठाकरे, राऊत आणि पटोले शांत’

दरम्यान, बांदीपोरा पनारमध्ये घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू आहे जिथे काल रात्री गोळीबार झाल्याची माहिती आहे. सुरक्षा दलांनी श्रीनगरमधील खन्यार भागातही घेराबंदी आणि शोधमोहीम राबवली आहे. यापूर्वी २९ ऑक्टोबर रोजी लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरमधील अखनूर येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. २० ऑक्टोबर रोजी, गांदरबल जिल्ह्यातील श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्याच्या बांधकामाच्या जागेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक डॉक्टर आणि सहा बांधकाम कामगार ठार झाले होते.

Exit mobile version