जम्मू आणि काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. नौपोरा भागात शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी पोलिस आणि लष्कराच्या पथकावर गोळीबार केला.
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये गुरुवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत एक नागरिकही जखमी झाला आहे.
परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने नोपोरामध्ये शोधमोहीम सुरू केली होती.
हे ही वाचा:
लंडनमध्ये भारतीय दूतावासावर हल्ला करणारा अटकेत
सलमान खान गोळीबार प्रकरण; हल्लेखोरांच्या पोलीस कोठडीत वाढ, आणखी दोघांना अटक
यूट्यूबर मनीष कश्यपचा भाजपमध्ये प्रवेश!
हे पथक संशयित जागेजवळ पोहोचताच लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली. लष्कर-ए-तैयबाचा एक टॉप कमांडर त्याच्या साथीदारासह या भागात अडकल्याचे समजते.
जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान जखमी झाल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे. चिंटीबंदी गावात जवान घरोघरी शोध घेत असताना दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात कारवाई सुरू केली.