पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर एका कुटुंबाकडून जबरदस्तीने टोल उकळल्याची घटना घडली आहे. कोणतीही पावती न देता जबरस्तीने पैसे मागितले गेल्याची घटना घडली होती. याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर चांगलाच गाजला होता.
टोल कर्मचाऱ्यांनी पैसे घेतले परंतु त्याची पावती मात्र दिली नाही. त्यांच्याकडे पावती मागितल्यावर त्यांनी शिविगाळ करायला सुरूवात केली. कर्मचाऱ्यांनी आपला मुजोरपणा दाखवत, हुज्जत घातली. कॅमेरा बंद करण्याबद्दल सुद्धा दादागिरी केली.
हे ही वाचा:
संजय राऊतांना समज द्या, काँग्रेसने शिवसेनेला ठणकावले
मलंगगड प्रकरणात चार मुसलमान तरुणांना अटक
समाजमाध्यमांवर यावरून संताप व्यक्त केला जात आहे. भाजापाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटरवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “बार रेस्टॉरंट कडून महिना १०० कोटीची खंडणी गोळा केल्यानंतर आता महाराष्ट्राचे टोलनाके वसुली केंद्रे झालेली दिसतात. जिथे राज्याच्या गृहमंत्र्यांवर खंडणी वसूलीचे आरोप होतात तिथे टोल नाक्यावर विना पावती टोल वसूल करणाऱ्यांना कोणाचा धाक असणार?” असा सवाल अतुल भातखळकरांनी यावेळी उपस्थित केला आहे.
बार रेस्टॉरंट कडून महिना १०० कोटीची खंडणी गोळा केल्यानंतर आता महाराष्ट्राचे टोलनाके वसुली केंद्रे झालेली दिसतात. जिथे राज्याच्या गृहमंत्र्यांवर खंडणी वसूलीचे आरोप होतात तिथे टोल नाक्यावर विना पावती टोल वसूल करणाऱ्यांना कोणाचा धाक असणार? pic.twitter.com/kWS35i201T
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 3, 2021
त्याबरोबरच भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्वीटरवरून हा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. ही टोळी कोणाची आणि ही वसूली कोणासाठी चालू आहे असा परखड सवाल देखील त्यांनी या ट्वीटमध्ये केला आहे.
हि कसली दादागिरी चालू आहे खेड शिवापूर टोल नाक्यावर
हा प्रायव्हेट टोल कुठला आणि कुणाचा ??
१९० रू.द्या पण पावती देणार नाही म्हणतात पोलिसांनाही घाबरत नाही करा तक्रार म्हणताहेत
हि टोळी कुणाची व कुणासाठी वसूली चालू आहे?
लक्ष द्या @mieknathshinde @puneruralpolice @nitin_gadkari pic.twitter.com/K1yAgqOhIf— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 1, 2021