22 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरक्राईमनामारेव्ह पार्टीत सापाचे विष वापरल्याप्रकरणी एल्विश यादवला समन्स

रेव्ह पार्टीत सापाचे विष वापरल्याप्रकरणी एल्विश यादवला समन्स

ईडीकडून होणार चौकशी

Google News Follow

Related

प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी २ चा विजेता सिद्धार्थ यादव उर्फ एल्विश यादव याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. रेव्ह पार्टीत सापाचे विष वापरल्या प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने एल्विश यादव याला समन्स बजावले आहे. एल्विश यादव याला २३ जुलै रोजी लखनऊला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. यापूर्वी ईडीने ८ जुलै रोजी नोटीस बजावली होती.

ईडीने युट्यूबर एल्विश यादव याला २३ जुलै रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. हे प्रकरण रेव्ह पार्ट्यांमध्ये नशा म्हणून सापाच्या विषाचा वापर करण्याशी संबंधित आहे. ईडीने याप्रकरणी मे महिन्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर, एल्विश आणि त्याच्याशी संबंधित लोकांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआर आणि आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर, नोएडा पोलिसांनी मनी लाँडरिंग (पीएमएलए) अंतर्गत आरोप दाखल केले होते. तसेच ८ जुलै रोजी त्याला समन्स पाठवण्यात आले होते मात्र, परदेशात असल्याचे कारण देत त्याने आणखी वेळ वाढवून घेतला होता.

रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याच्या चौकशीच्या संदर्भात नोएडा पोलिसांनी १७ मार्च रोजी एल्विश यादवला अटक केली होती. युट्यूबर एल्विश यादव हा बिग बॉस ओटीटी २ या रिॲलिटी शोचा विजेता आहे. नोएडा पोलिसांनी एल्विशविरुद्ध नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.

हे ही वाचा:

ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या शिवानी राजा यांनी भगवद्गीता हातात घेऊन घेतली खासदारकीची शपथ

मराठा आरक्षणावरून विधानसभेत भाजपचे नेते कडाडले, विरोधकांची पळापळ!

मुस्लीम महिलाही पोटगी मागू शकतात

बाप दाखव नाही, तर श्राद्ध कर…. भूमिका घेताच विरोधक पळाले!

पीपल फॉर ॲनिमल्स या एनजीओच्या तक्रारीवरून नोएडातील सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी ३ नोव्हेंबरला एफआयआर दाखल करण्यात आलेल्या सहा जणांमध्ये एल्विश यादव यांचा समावेश होता. यामध्ये आणखी पाच आरोपी होते, हे सर्व सर्पमित्र आहेत. ३ नोव्हेंबरला नोएडाच्या बँक्वेट हॉलमधून या सर्पमित्रांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याजवळ पाच कोब्रासह नऊ साप आढळून आले, याशिवाय २० मिली सापाचे विषही जप्त करण्यात आलं होतं. या आरोपींवर सापांची तस्करी, अंमली पदार्थांचा वापर आणि रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करण्याचे आरोप आहेत. त्याला नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती आणि नंतर स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा