बेंगळुरूमध्ये ज्येष्ठ महिलेची हत्या; ड्रममध्ये सापडले अवयव!

घटना काल घडल्याची शक्यता

बेंगळुरूमध्ये ज्येष्ठ महिलेची हत्या; ड्रममध्ये सापडले अवयव!

बेंगळुरूमध्ये एका ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेची हत्या झाली असून तिचे अवयव केआर पुरम परिसरातील ड्रममध्ये सापडले आहेत. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पडक्या घराला लागून असलेल्या मोकळ्या जागेत या महिलेचा मृतदेह आढळून आला.

ही ज्येष्ठ महिला तिच्या मुलीसोबत केआर पुरमजवळ भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहात होती. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने पीडितेचे हात आणि पाय कापले आणि इतरत्र टाकून दिले. त्यानंतर शरीराचे उर्वरित अवयव ड्रममध्ये टाकले. स्थानिकांना ड्रममधून दुर्गंधी येत असल्याचे आढळून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर त्यांनी तत्काळ बेंगळुरू पोलिसांना याबाबतची तक्रार केली. ‘घटना काल घडली असावी. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह येथे आहे. एका अंदाजे ६५ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली असून तिचा मृतदेह एका पडक्या ठिकाणी टाकण्यात आला होता,’ असे बेंगळुरूचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रमण गुप्ता यांनी सांगितले.

हे ही वाचा:

राष्ट्रीय लोकदलाच्या हरयाणा अध्यक्षाची गोळी झाडून हत्या!

मराठा आंदोलन: मराठवाड्यातील इंटरनेट सेवा बंद!

आधी ग्रामस्थांकडून चपलेने मार, नंतर तृणमूलचा नेता पोलिसांच्या ताब्यात!

ज्ञानवापीतील ‘व्यास तळघरा’मध्ये पूजा सुरूचं राहणार!

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. गुप्ता म्हणाले, ‘आम्ही सक्रियपणे तपास करत आहोत आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्याचे आमचे ध्येय आहे.’ पीडित महिला तिची मुलगी आणि काही नातेवाइकांसोबत राहत होती. कुटुंबातील इतर नातेवाईकही परिसरात राहतात.

Exit mobile version