निर्माती आणि अभिनेत्री एकता कपूर आणि तिचे ओटीटी चॅनल ‘Alt Balaji’ अनेकदा सर्व चुकीच्या कारणांमुळे चर्चेत असतात. २०२० मध्ये, माजी सैनिक शंभू कुमार यांनी एकता कपूरच्या वेब सीरिज ‘एक्सएक्सएक्स’ विरुद्ध आक्षेपार्ह दृश्यांवर तक्रार दाखल केली होती. दरम्यान न्यायालयाने एकता कपूर यांना, वेब सिरिजच्या माध्यमातून भारतातील तरुण पिढीची मानसिकता बिघडवत आहात, असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ‘एक्सएक्सएक्स’ वेब सिरिजच्या निर्मात्या एकता कपूर यांच्यावर ओढले. तसेच न्यायालयाने आक्षेपार्ह दृश्यांबाबत ही टिप्पणी केली आहे.
या वेब सिरीजमुळे भारतीय लष्करातील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार असून, याप्रकरणी एकता कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. या अटक वॉरंटविरोधात कपूर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. तसेच न्या. अजय रेस्तोगी आणि न्या.सी.टी. रवींद्रकूमार यांचा समावेश असेलेल्या खंडपीठाने ओटीटी वरील सर्वांपर्यंत खुल्या मार्गाने पोहोचत आहेत. वेब सिरिज माध्यमासाठी तुम्ही लोकांपुढे कोणते माध्यम ठेवत आहात, अशी विचारणा खंडपीठाने केली.
हे ही वाचा
‘महिला आणि मुलींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय नाही’
दारूच्या नशेत मुलीला फरफटत नेलेला रिक्षाचालक अटकेत
काश्मीरच्या सार्वजनिक उद्यानात फडकला १०८ फूट उंच तिरंगा
INS अरिहंतवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
कपूर यांचे अधिवक्ता मुकूल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले की, याप्रकरणी आम्ही पाटणा उच्च न्यायालयात याचिका केली आहे, पण तेथे ती लवकर सुनावणीला येईल असे आम्हाला वाटत नाही. अशाच एका अन्य प्रकरणात याआधी सर्वोच्च न्यायालयाने कपूर यांना संरक्षण दिले होते. ही वेब मालिका वर्गणीदारांसाठी आहे. या देशात लोकांना पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. असे कपूर यांच्या वतीने सांगण्यात आले.