उत्तर प्रदेशातील एका मतदान केंद्रावर एका तरुणाने भाजपच्या उमेदवाराला आठवेळा मत दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी रविवारी या तरुण मतदाराला अटक केली. या आरोपीचे नाव राजन सिंह असे आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस, समाजवादी पक्षाने गदारोळ माजवला होता. त्यानंतर त्वरित पावले उचलून उत्तर प्रदेश पोलिसांनी या तरुणाला अटक केली.
या दोन मिनिटांच्या व्हीडिओमध्ये हा तरुण भाजप उमेदवार मुकेश राजपूत यांना ईव्हीएमवर आठवेळा मत देताना दिसत आहे. मात्र या व्हिडीओची सत्य पडताळणी होऊ शकलेली नाही. मुकेश राजपूत हे उत्तर प्रदेशमधील फारुखाबाद मतदारसंघाचे उमेदवार आहेत.
हा व्हिडीओ उघड झाल्यानंतर नया गाव पोलस ठाण्यात या प्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक आयोगानेही या व्हिडीओची दखल घेतली असून संबंधित प्रशासनाला याबाबत त्वरित आणि योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेण्यात आली आहे. संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना या प्रकरणी त्वरित आणि योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत,’ असे उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या मतदान केंद्रावर ही घटना घडली, त्या केंद्रांवरील सर्व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करावे, असे निर्देश निवडणूक समितीने प्रशासनाला दिले आहेत.
हे ही वाचा:
देशात पाचव्या टप्प्यात ४९ जागांचे भवितव्य ठरणार; राज्यात अंतिम टप्प्याच्या मतदानासाठी रांगा
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष रईसी यांचा मृत्यू
‘मुख्यमंत्री केजरीवाल हे धूर्त, अहंकारी अन सर्वात मोठे बेईमान’
गोंधळामुळे राहुल गांधी, अखिलेश यांचा भाषण न करताच काढता पाय!
काँग्रेस आणि समाजवादी काँग्रेसने हा व्हिडीओ पोस्ट करून निवडणूक आयोगाचे याकडे लक्ष आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर त्वरित चक्रे फिरून उत्तर प्रदेश पोलिसांनी या तरुणाला अटक केली.