दादर टीटी उड्डाणपुलाजवळ ‘तेजस्विनी’ धडकली डंपरला!

दादर टीटी उड्डाणपुलाजवळ ‘तेजस्विनी’ धडकली डंपरला!

मुंबईतील दादर टीटी उड्डाणपूल येथे आज (२७ ऑक्टोबर) सकाळी तेजस्विनी बस आणि एका डंपरमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. मरोळ मरोशीहून पायधुनी येथे जाणारी बस मार्ग क्रमांक २२ या बसला अपघात होऊन यामध्ये आठ जण जखमी झाले असून बसचे चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे चित्रण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. अपघातानंतर बसच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला आहे.

आज सकाळी ७.१५ च्या सुमारास मरोळ मरोशीहून पायधुनी येथे जाणारी बस मार्ग क्रमांक २२ ही दादर टीटी उड्डाणपुलाजवळ येताच चालकाचे नियंत्रण सुटून बस थेट रस्त्यावरून जाणाऱ्या डंपरला पाठीमागून जोरदार धडकली. या अपघातामध्ये बसमधील चालक, वाहक आणि सहा प्रवासी जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.

हे ही वाचा:

माझा पक्ष भाजपाशी युती करणार

हिमवर्षावात बालमित्रांनी गमावले प्राण!

‘दाऊद आपल्या देशात नसला, तरीही त्याचा प्रभाव महाविकास आघाडी सरकारवर आहे’

नुकसान भरपाईच्या शासन यादीतून पश्चिम विदर्भ गायब!

या अपघातात जखमी झालेले बसचे चालक राजेंद्र (५३), वाहक काशीराम धुरी (५७), प्रवासी ताहीर हुसैन (५२), रुपाली गायकवाड (३६), सुलतान (५०) यांची प्रकृती चिंताजनक असून प्रवासी मन्सूर अली (५२), श्रावणी म्हस्के (१६), वैदेही बामणे (१७) यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सायन रुग्णालयातील डॉ. सुधीर यांनी दिली आहे.

Exit mobile version