पंतप्रधान मोदींविरोधात पोस्टर, आठ जणांना अटक

गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू

पंतप्रधान मोदींविरोधात पोस्टर, आठ जणांना अटक

गुजरातमधील अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्टर लावल्याप्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे. शहरातील विविध भागात ‘मोदी हटाओ, देश बचाओ’चे पोस्टर लावण्यात आले होते. गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आम आदमी पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशव्यापी पोस्टर मोहीम केली आहे. आम आदमी पार्टीने देशभरात ११ भाषांमध्ये भाजपविरोधात ही पोस्टर मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम सुरु झाल्याच्या एका दिवसांतरच ही अटक करण्यात आली आहे. इंग्रजी, हिंदी आणि उर्दू व्यतिरिक्त गुजराती, पंजाबी, तेलुगु, बंगाली, ओरिया, कन्नड, मल्याळम आणि मराठी भाषेतही पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

अहमदाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आक्षेपार्ह पोस्टर शहराच्या विविध भागांमध्ये अनधिकृत पद्धतीने लावण्यात आले होते असे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

‘सावरकर गौरव यात्रेला’ जळगावातून सुरुवात

पंतप्रधानांनी पाहिले नवे संसदभवन… भव्य, सुसज्ज आणि नव्या रंगरूपात

मालवणीत तणावपूर्ण शांतता, पुन्हा गोंधळ, धरपकड सुरु

विहिरीचे छत कोसळून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या ३५

‘राहुल गांधींना राजकीय पटलावरून हटवण्याचे षडयंत्र काँग्रेसमध्येच सुरू!’

गेल्या आठवड्यात, पंतप्रधानांना लक्ष्य करणारे हजारो पोस्टर्स राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील भिंतींवर दिसू लागले, त्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली, ४९ एफआयआर नोंदवले आणि सहा जणांना अटक केली. अटक केलेल्यांपैकी दोघे प्रिंटिंग प्रेसचे मालक होते. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणे आणि पोस्टरवर छापखान्याचे नाव न लावल्याने ही अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version