झारखंडमध्ये नक्षलवादाविरोधातील लढाईमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. सोमवारी पहाटे झालेल्या चकमकीत आठ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) कोब्रा कमांडो आणि पोलिसांनी ही मोहीम राबवली होती. या कारवाईदरम्यान आठ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. यात एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षल नेत्याचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोमवार, २१ एप्रिल रोजी सकाळी झारखंडमधील बोकारो जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा कमांडो आणि पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. बोकारो जिल्ह्यातील लालपानिया भागातील लुगु हिल्समध्ये पहाटे ५.३० वाजता सुरू झालेला गोळीबार अजूनही सुरूच आहे, अशी माहिती आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०९ कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शनच्या (कोब्रा) जवानांनी ही कारवाई केली. ज्यामध्ये आठ नक्षलवादी मारले गेले. यात एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षल नेत्याचा समावेश आहे. शिवाय त्यांच्याकडून दोन इन्सास रायफल, एक सेल्फ-लोडिंग रायफल (एसएलआर) आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले.
Jharkhand | In the Bokaro encounter, Vivek, a maoist with a reward of Rs 1 crore, was also killed during the encounter. A total of 8 bodies of naxals have been recovered so far: DGP Jharkhand pic.twitter.com/1CGdD1iIJh
— ANI (@ANI) April 21, 2025
यापूर्वी, छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शुक्रवार, १८ एप्रिल रोजी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. तब्बल ३३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात महिलांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यातील १७ जणांच्या डोक्यावर लाखोंचे बक्षीस होते. आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी सुरक्षा दलांवरील अनेक हल्ल्यांमध्येही सहभागी होते.
हे ही वाचा :
खलिस्तान्यांकडून तिसऱ्यांदा ब्रिटिश कोलंबिया येथील हिंदू मंदिराची तोडफोड
हुथी बंडखोरांवरील हल्ल्याच्या योजना अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी कुटुंबियांसोबत केल्या शेअर?
जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूर, तिघांचा मृत्यू!
काही दिवसांपूर्वीचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना शस्त्रे खाली ठेवून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले होते. मार्च २०२६ पर्यंत छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशातील लाल दहशतवाद संपवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे प्रतिपादनही अमित शाह यांनी केले होते.