आठ तासांची फिल्डिंग आणि चोर आले ताब्यात

वर्सोव्यात बंद घराची 'घरफोडी'

आठ तासांची फिल्डिंग आणि चोर आले ताब्यात

मुंबईत दिवसेंदिवस घरफोड्याचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरुच आहेत. अशीच एक घटना मुंबईतील वर्सोवा पोलिस स्थानकांच्या हद्दीत घडली आहे. त्यामध्ये दोन चोरट्यांचा समावेश आहे. सूर्या नाडर आणि राहुल मुदामे अशी दोन आरोपींची नावे असून या दोघांना पोलिसांनी पकडले आहे व न्यायालयाने त्या दोघांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

संबंधित घटनेचे तक्रारदार हे वर्सोवा येथे राहत असून त्यांचा माल वाहतुकीचा व्यवसाय आहे. या तक्रारदारांच्या बंगल्या शेजारी एक जोडपे राहत होते. सप्टेंबर महिन्यात ही महिला रस्ते अपघातात जखमी झाल्याने तिला अंधेरी येथील रुग्णालात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचारा दरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला.

महिलेचा अंत्यविधी उत्तर प्रदेशमध्ये

महिलेचा रुगाणालयात मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी त्या महिलेला उत्तर प्रदेश येथे नेले. त्यामुळे त्यांनी बंगल्याची चावी व्यवसायिकाकडे दिली होती. व्यावसायिक आणि त्याची पत्नी घरातील सफसफाई व झाडांना पाणी घालण्याचे काम कारायचे. मात्र बंगल्यात मागच्या आठवड्यात सकाळी त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. ही घटना समजताच त्यांनी वर्सोवा पोलिस ठाण्याला घरफोडीची माहिती दिली.

हे ही वाचा : 

दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे नव्हतेच, मग तो मृत्यू अपघाती असल्याचा दावा कुणाचा?

उद्धव ठाकरे राज्यपालांवर घसरले!

एअर इंडियाच्या विमानातील कर्मचाऱ्यांना टिकली, बांगडीबद्दल सूचना

मुंबईकरांना दुमजली बसची प्रतीक्षाच!

या घरफोडी दरम्यान चोरांनी एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तसेच घरफोडीप्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे व तपासणी दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक गाडी दिसली. त्या गाडी वरुण तपासाची चक्र फिरली व नाडर व मुदामे यांना पकडण्यासाठी ८ तासांची फिल्डिंग लावून ताब्यात घेण्यात आले.

Exit mobile version