वाशी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. केवळ सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी या आठही आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून एक लाख २९ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. श्रीकेश मोर्या, युसूफ मुलतानी, यतीन नांडोडकर, आरिफ अन्सारी, किशाल जैस्वाल, सुशांत कांबळे, इम्रान खान, वकार खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या सर्व आरोपींना वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर जबरी चोरी, मोबाईल चोरी आणि पाकीटमार असे गुन्हे दाखल आहेत. याच गुन्ह्यांचा तपास करत असताना घटनास्थळावर सीसीटीव्ही मधील चित्रणाचे निरीक्षण करून सदर आरोपींचे फोटो खबऱ्यांना देण्यात आले. पुढे शोध घेतल्यावर आठही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
औरंगाबाद महापालिकेतही होता तळीरामांचा अड्डा?
छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्, अशी ठाकरे सरकारची चंपी
अटक केलेल्या आरोपींकडून सोन्याची साखळी, पाच मोबाईल आणि एक रिक्षा असा एकूण १ लाख २९ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली आहे. आरोपींमधील इम्रान आणि वकार हे दोघे मिळून गुन्हे करत असत. हे दोघेही जबरी चोरी करत असत. युसूफ आणि यातीने यांच्या नावे पाकीटमारीचे गुन्हे केल्याची नोंद आहे. मोर्य आणि अन्सारी याच्यावर मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल आहे. तर कांबळे आणि जैस्वाल यांनी जबरी चोरी केल्याचे समोर आले आहे.