रेल्वे पोलीस विभागाला ४०० टक्क्याचे अमिष दाखवून निविदा केली मंजूर

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमागील वास्तव

रेल्वे पोलिसांना ४०० टक्के महसुलाचे आमिष दाखवुन ईगो मीडिया कंपनीच्या माजी संचालिका जान्हवी मराठे हिने तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त यांच्याकडून महाकाय होर्डींग उभी करण्यासाठी निविदा मंजूर करून घेतल्याची धक्कादायक बाब विशेष तपास पथकाच्या तपासात समोर आली आहे.

जान्हवी मराठे आणि सागर कुंभार यांना शनिवारी गोव्यातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील ही चौथी अटक आहे. यापूर्वी ईगो मीडियाचे मालक भावेश भिंडे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट मनोज संघु यांना अटक करण्यात आली होती.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडे नसून जान्हवी मराठे ही आहे, कारण होर्डिंग उभारण्यासाठी निविदा मंजूर करून घेण्यासा पासून ते निविदेत बदल करून ८० बाय ८० फूट वरून होर्डिंगचा आकार वाढविण्यामागे जान्हवी मराठे हिनेच पुढाकार घेतल्याचे विशेष तपास पथकाच्या आतापर्यतच्या तपासात समोर आले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जान्हवी मराठे उर्फ सोनलकर ‘ ईगो मिडीया प्रा.लि. या कंपनीच्या सुरुवातीपासून संचालक होत्या. त्यांनीच ७ मे २०२१मध्ये रेल्वेचे तत्कालीन पोलीस आयुक्त यांना स्वतःच्या स्वाक्षरीचे पत्र दिले होते कि, ईगो कंपनीला घाटकोपर पूर्व रेल्वे पोलिसांच्या जागेवर होर्डिंग उभारण्यासाठी निविदा देण्यात यावी असे पत्रात म्हटले होते.

निविदेनुसार त्यांच्या कंपनीला दुर्घटनाग्रस्त होडींगची उभारणी करण्यापूर्वी बाजुच्या उपलब्ध जागेवर यापुर्वी उभारणी करण्यात आलेल्या तीन होर्डिंगसाठी ४० बाय ४० फुट परवानगी दिलेली होती. मराठे हिने दिलेल्या पत्रात असे नमुद केलेले होते कि, या जागेमध्ये व्यावसायीक वापरासाठी भरपुर जागा उपलब्ध असल्याने ४० बाय ४० चौ. फुट ऐवजी ८० बाय ८० चौ. फुटाची तीन होर्डिंगकरिता परवानगी दिल्यास आपल्या रेल्वे विभागास ४०० टक्के अधिक महसूल प्राप्त होईल,अशा पध्दतीचे पत्र देवून मराठे हिने निवीदा मंजूर करून घेतली. त्या नंतर निवीदेतील अटी व शर्तीचे उल्लंघन करून जान्हवी मराठेने निवीदेत मंजूर असलेल्या जाहिरात होर्डिंग आकारमानाचे सर्वप्रथम उल्लंघन केले, त्या नंतर तीन होर्डीगसाठी मंजुरी प्राप्त करून घेतली असे पोलीस तपासात समोर आले आहे,जान्हवीचा सहभाग हा मर्यादीत नसून तो मुख्य आरोपी व इतरांसह केलेले गंभीर कृत्य असल्याचे तपास पथकाने म्हटले आहे.

हे ही वाचा:

बेटकुळ्या दाखवणाऱ्यांना महायुतीचे नेते वेसण घालतील काय?

मुंबई विमानतळावर १९ कोटींचे सोने जप्त; दोन परदेशी महिलांना अटक

बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा

भारत- पाक सामन्यात रोहित शर्माने भारतीय संघाचे वाढवले मनोधैर्य

१३ मे रोजी घाटकोपर पूर्व येथे असलेल्या रेल्वे पोलीसांच्या जागेवर असणारे महाकाय बेकायदेशीर होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून ८० जण जखमी झाले होते. या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात इगो मीडिया प्रा. लिमिटेड कंपनीच्या संचालक, मालक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता, गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक गठीत करण्यात आले असून या गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

Exit mobile version