कोळसा घोटाळा प्रकरणी ईडीची मोठी कारवाई

कोळसा घोटाळा प्रकरणी ईडीची मोठी कारवाई

एप्रिल ते डिसेंबर २०२० मध्ये कोल इंडियाने लिलावात काढला ८१.४ दशलक्ष टन कोळसा. २०१९ मध्ये याच कालावधीत ३५.२ दशलक्ष टन कमी कोळसा विकला.

देशात सध्या अनेक बेकायदेशीर ठिकाणी ईडीच्या धाडी पडत आहेत. नुकतीच ईडीने पश्चिम बंगालमधील बेकायदेशीर प्रसिद्ध कोळसा घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. या कोळसा घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी अनुप मांझी याच्या दोन साथीदारांची ईडीने मालमत्ता जप्त केली आहे. या दोन साथीदारांची नावे जयदेव मंडल आणि गुरुपाद मांझी अशी आहेत.

या करावाईत ईडीने मंगळवार, १३ जुलै रोजी आरोपींची २५ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या जंगम स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. यापूर्वी या प्रकरणी ईडीने ५६ ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यातून ईडीने आतापर्यंत १८१ कोटी रुपयांहून अधिक किमतीची जंगम स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणी ईडीने विकास मिश्रा, अशोक मिश्रा आणि गुरुपद मांझी यांनाही अटक केली आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान साहित्य मुंबईत दाखल

गुजरात दंगल प्रकरणात सेटलवाड, श्रीकुमार यांच्यानंतर संजीव भट्ट यांना अटक

एमआयएमचे शंभरहून अधिक कार्यकर्ते देणार राजीनामे

केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्बफेक

कोळसा घोटाळा प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुखमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सोबतच त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी हेदेखील ईडीच्या रडारवर होते. ईडीकडून अनेकदा त्यांची चौकशीही करण्यात आली आहे. मनी लांड्रिंग कायद्यांतर्गत सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे या लोकांविरोधात एफआयआर दाखल करत तपास सुरू करण्यात आला होता. गुरुपाद मांझी याने गुन्ह्यातून कमावलेले ८९ कोटींहून अधिक रुपये आणि जयदेव मंडल याने २०१७ ते २०२० दरम्यान अनुपमा जीच्या लोकांना ५८ कोटींहून अधिक रक्कम दिली होती.

Exit mobile version