21 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरक्राईमनामानितीन देसाईप्रकरणी एडलवाईजच्या अधिकाऱ्यांनी केली एफआयआर रद्द करण्याची मागणी

नितीन देसाईप्रकरणी एडलवाईजच्या अधिकाऱ्यांनी केली एफआयआर रद्द करण्याची मागणी

नितीन देसाईंनी केली होती आत्महत्या

Google News Follow

Related

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर आता त्याला कारणीभूत असल्याच्या संशयावरून त्यांना कर्ज देणाऱ्या एडलवाइज असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक राज कुमार बन्सल आणि अध्यक्ष रसेश शहा यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला. आता या दोघांनीही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत आपल्याविरोधात करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे.

 

२ ऑगस्ट रोजी नितीन देसाई यांचा मृतदेह त्यांच्याच एनडी स्टुडिओत आढळला होता. त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले होते. पण या आत्महत्येला बन्सल आणि शहा जबाबदार असल्याचे देसाई यांनी ऑडिओ क्लिपमध्ये सांगून ठेवले होते. कर्जत येथे नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओ होता. त्यासाठी त्यांनी मोठे कर्ज घेतले होते. जवळपास २५२ कोटींचे कर्ज त्यांच्या डोक्यावर होते. शिवाय, कोरोनाच्या काळात सगळी कामे ठप्प झाल्यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे बोलले जाते. त्यातून त्यांना कर्ज फेडणे शक्य नसल्याचे म्हटले जात होते. १८१ कोटींचे कर्ज वाढत २५२ कोटींपर्यंत पोहोचले.

 

हे ही वाचा:

राहुल गांधी सावरकर कधीच होऊ शकत नाहीत…

सूर्यकुमारमुळे भारताचे आव्हान जिवंत

टेस्लाला प्राप्त होणार भारतीय ‘वैभव’

मोहोब्बत की दुकान, चायना का सामान; भारतविरोधी कारवायांसाठी चीनचे न्यूजक्लिकला फंडिंग

देसाई यांच्या कुटुंबियांनी सांगितले की, कर्ज एडलवाइजकडून २०१६ आणि २०१८ या दरम्यान घेतले होते. त्यातील काही भाग फेडण्यात आला होता. एडलवाईजचे अधिकारी बन्सल आणि शहा हे देसाई यांच्यावर कर्ज फेडण्यासाठी दबाव आणत असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर पोलिसांनी या दोघांविरोधात एफआयआर दाखल केला. त्याशिवाय, जितेंद्र कोठारी या मध्यस्थाविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली.

 

पोलिसांनी याप्रकरणात साक्षीदारांचे १० जबाब नोंदविले आहेत. त्याशिवाय, बन्सल आणि शहा यांना जाबजबाबासाठी पोलिसांनी बोलावले होते. त्यानंतर या दोघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली. कर्ज वसूल करण्यासाठी आपण कायदेशीर पद्धतीनेच पाठपुरावा करत होतो. त्यामुळे आपल्याविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप वगळण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

नितीन देसाई हे गेली अनेक वर्षे कलादिग्दर्शन क्षेत्रात आघाडीवर होते. जोधा अकबर, देवदास अशा अनेक चित्रपटांत त्यांचे भव्यदिव्य सेट्स सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनले होते. लालबागच्या राजाची संपूर्ण सजावट नितीन देसाई करत. पण २ ऑगस्टला त्यांचा गळफास घेतलेला मृतदेह त्यांच्या स्टुडिओत आढळला. यानंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली. त्यांची मुले परदेशातून परत आल्यावर त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

दरम्यान, मंगळवारी सकाळी १० पासून त्यांची चौकशी झाली होती. एडलवाईजचे एमडी आणि इतर तीन अधिकारी सकाळी १० वाजता चौकशीला हजर झाले होते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ही चौकशी झाली. आता एडलवाईज कंपनीचे एमडी आणि इतर अधिकाऱ्यांना पुन्हा नोटीस पाठविण्यात आली आहे. ११ तारखेला एडलवाईजच्या एमडीना पुन्हा चौकशीला बोलावण्यात आले आहे. अपुरी असणारी कागदपत्र घेऊन पुन्हा चौकशीला हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा