चीनी कंपनी शाओमी टेक्नोलॉजीला अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने दणका दिला आहे. ईडीच्या निर्णायक प्राधिकरणाने शाओमी टेक्नॉलॉजी या चीनच्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. शाओमी कंपनीचे अधिकारी आणि तीन मोठ्या बँकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
शाओमी कंपनीवर ईडीने फेमा अंतर्गत कारवाई करत याआधी तब्बल ५ हजार ५५१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त मालमत्तेची कारवाई ईडीच्या निर्णायक प्राधिकरणाने योग्य असल्याचेही म्हटलं आहे. कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक मनुकुमार जैन आणि कंपनीचे विद्यमान संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी समीर बी राव यांच्यासह कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
हे ही वाचा:
रामायण फेम दीपिका चिखलियांची ‘आदिपुरुष’मधील कृती सॅननवर टीका
धमक्या देण्याचा अधिकार फक्त मविआच्या नेत्यांना
इजिप्तमध्ये पर्यटकाला शार्कने नेले पाण्यात ओढून; व्हायरल व्हीडिओमुळे थरकाप
चित्रा वाघ संतापल्या, आव्हाड नाही…हाड हाड!
फेमाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने सीआयटीआय बँक, एचएसबीसी बँक आणि ड्यूश बँक एजीला देखील कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. सीआयटीआय बँक, एचएसबीसी बँक आणि ड्यूश बँक एजीला फेमाच्या कलम १० (४) आणि १० (५) चं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. परदेशात कंपनीकडून रॉयल्टीच्या रुपाने पैसे पाठवण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि तसेच तडतोड केल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं आहे.