माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स

माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणातून समन्स बजावले आहे. जुन्या एका प्रकरणात त्यांचा संबंध आढळल्याने त्यांना ईडीने समन्स बजावले आहे. ५ जुलैला संजय पांडे यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. नुकतेच संजय पांडे हे सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या जागी विवेक फणसाळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी निवड झाली आहे.

३० जूनला संजय पांडे यांची सेवा निवृत्ती झाली. सेवा निवृत्ती होऊन चार दिवस उलटत नाहीत तोवर त्यांना मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीचे समन्स आले आहे. ५ जुलैला सकाळी ११.३० वाजता त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. जुन्या एका मनी लाँडरिंग प्रकरणात त्यांना हि नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्यांची पोलीस आयुक्तपदाची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती.

हे ही वाचा:

राहुल नार्वेकरांच्या पाठीशी राजकारणाचा वारसा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचे कौतूक

शिवसेना चित्रपट सेनेला खिंडार; उपाध्यक्ष दिगंबर नाईक भाजपच्या वाटेवर?

सामाजिक संदेश देणारा ‘व्हॅलिअंट फेम आयकॉन ऑफ महाराष्ट्र २०२२’ शो

२८ फेब्रुवारी २०२२ ला संजय पांडे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. पाच महिन्याच्या काळात त्यांनी अनेक नवे नियम आणि योजना मुंबईकरांसाठी सुरु केल्या होत्या. त्यांच्या या नियम आणि योजनांमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले होते. आता एका प्रकरणात त्यांना ईडीची नोटीस आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Exit mobile version