काँग्रेसच्या पाच नेत्यांना ईडीकडून समन्स

अंमलबजावणी संचालनालयाकडून म्हणजेच ईडीकडून काँग्रेसमधील पाच नेत्यांना समन्स बजावण्यात आले आहे.

काँग्रेसच्या पाच नेत्यांना ईडीकडून समन्स

एकीकडे काही राज्यांमध्ये काँग्रेसला गळती लागलेली असताना दुसरीकडे काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सुरू आहे. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाकडून म्हणजेच ईडीकडून काँग्रेसमधील पाच नेत्यांना समन्स बजावण्यात आले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात तेलंगणामधील काँग्रेसच्या पाच नेत्यांना इडीने नोटीस दिली असून आज चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

मोहम्मद अली शब्बीर, गीता रेड्डी, सुदर्शन रेड्डी, अंजन कुमार आणि गली अनिल या पाच जणांना ईडीने समन्स बजावले आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक असताना या नेत्यांनी त्यासाठी मोठी देणगी दिली होती. याच प्रकरणाचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने या पाच नेत्यांना समन्स दिले आहे.

यापूर्वी ईडीने काँग्रेस कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना नॅशनल हेराल्ड वृत्तपत्रातील कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे भारत जोडो यात्रा सुरू असताना नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कथित मनी लाँड्रिंग संदर्भात ईडीकडून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची सतत चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

हे ही वाचा:

रायगडच्या जवानाला काश्मीर खोऱ्यात आले ‘वीरमरण’

टेकूच्या शोधात शिल्लक सेना…

अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर, भाजपाकडून मुरजी पटेल रिंगणात

भारतीय हवाई दलाला मिळाली स्वदेशी ‘प्रचंड’ ताकद

नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित ईडीकडून काही दिवसांपूर्वी यंग इंडियनचे कार्यालय सील करण्यात आले होते. तसेच हे कार्यालय परवानगीशिवाय उघडू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या.

Exit mobile version