बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिच्या अडचणीत वाढ झाली असून ईडीने तिला पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलीन हिला समन्स बजावण्यात आले आहे. त्यानुसार जॅकलीन हिला आज, १९ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
यापूर्वी १४ सप्टेंबर रोजी जॅकलीन ईडीसमोर हजर झाली होती. त्यावेळी जॅकलीनची तब्बल आठ तास चौकशी सुरू होती. ईडीने जॅकलीनचा जबाब नोंदवून घेतला होता. तसेच सुकेश चंद्रशेखरसोबतचे संबंध आणि त्याच्याकडून मिळालेल्या भेटवस्तू यासंदर्भात इडीकडून प्रश्न विचारण्यात आले होते.
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, जॅकलीनला सुकेश चंद्रशेखरने तब्बल १० कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आणि हा पैसा सुकेशने केलेल्या २०० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणातला होता. शिवाय जॅकलीनला याची पूर्वकल्पना असताना तिने या भेटवस्तू स्वीकारल्यामुळे जॅकलीनला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
हॉस्टेलमधील ‘त्या’ मुलींचे व्हिडीओ काढणाऱ्या मुलीला शिक्षिकेने विचारला जाब
राज ठाकरेंनी विदर्भात निवडणूक तयारीचे दिले आदेश
मोदींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा जागतिक विक्रम
होस्टेलमधील ६० मुलींचे व्हिडीओ व्हायरल, आठ जणींचा आत्महत्येचा प्रयत्न
सुकेशनं जॅकलीनला ५२ लाखांचा अरबी घोडा आणि प्रत्येकी ९ लाख रुपये किंमत असलेल्या चार पर्शियन मांजर भेट म्हणून दिले होते. तसेच महागडी ज्वेलारीदेखील सुकेश याने जॅकलीनला दिली होती.