कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना ईडीकडून समन्स

सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने मनी लाँडरींगप्रकरणी कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना समन्स बजावले आहे.

कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना ईडीकडून समन्स

काही राज्यांमध्ये गळती लागलेल्या काँग्रेसच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने मनी लाँडरींगप्रकरणी कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना समन्स बजावले आहे. त्यानंतर शिवकुमार यांनी केंद्रीय यंत्रणांवर आणि विरोधकांवर टीका केली आहे.

काँग्रेसची राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली सध्या ‘भारत जोडो यात्रा’ सुरू आहे. या यात्रेची व्यवस्था करण्यात सध्या शिवकुमार व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांनी समन्सच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

डी. के. शिवकुमार यांनी ट्विट करून या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “भारत जोडो यात्रा आणि सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान आपल्याला समन्स बजावले आहे. मी तपासात सहकार्य करण्यास तयार आहे, परंतु या समन्सची वेळ पाहता माझी घटनात्मक आणि राजकीय कर्तव्ये पार पाडण्याच्या मार्गात अडथळा आणण्याचा डाव आहे,” असे ट्विट डी. के. शिवकुमार यांनी केले आहे.

 

शिवकुमार हे काँग्रेसचे कर्नाटक प्रदेश अध्यक्ष आहेत. त्यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स बजावले आहे. २०१८ मध्ये त्यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवकुमार यांच्यावर कथित करचोरी आणि ‘हवाला’च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार असे आरोप करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

२४ वर्षांच्या कारकिर्दीत २० ग्रँड स्लॅम खिताब जिंकणाऱ्या रॉजर फेडररचा टेनिसला अलविदा

जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला

‘नवाब मलिकांच्या निर्दोषतेचा प्रश्नच उद्भवत नाही’

सर विश्वेश्वरय्यांनी अचानक रेल्वेची साखळी खेचली आणि सगळ्यांनाच धक्का बसला

या प्रकरणी ईडीने सप्टेंबर २०१९ मध्ये डी. के. शिवकुमार यांना अटक केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. शिवकुमार यांनी हे आरोप निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते.

Exit mobile version