अनिल देशमुख यांची पुन्हा हुलकावणी

अनिल देशमुख यांची पुन्हा हुलकावणी

सर्वोच्च न्यायालयात ईडीच्या कारवाई पासून दिलासा मिळावा यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उद्या म्हणजे ३ ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. ईडीनेही त्यांना नव्याने सोमवारी हजर राहण्यासाठी समन्स पाठविले होते.

तत्पूर्वी ईडीने अनिल देशमुख आणि त्यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना समन्स बजावून सोमवारी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र अनिल देशमुख यांनी दोन पानी पत्र वकिलामार्फत ईडीला पाठवले आहे. त्यामुळे अनिल देशमुख ईडी कार्यालयात गैरहजर राहण्याची शक्यता नाही.

अनिल देशमुख यांनी ईडीच्या कार्यालयात चौकशीला जाण्यास नकार देत ईडीला वकिलांमार्फत पत्र दिलं आहे. यामध्ये त्यांनी याआधी ज्या मागण्या केल्या होत्या त्याच मागण्या आता देखील केल्या आहेत. माझी व्हिडिओ, ऑडिओद्वारे चौकशी करा, अशी मागणी पुन्हा एकदा केली. तसंच, मला ‘इसीआयआर ‘ची प्रत द्या किंवा कमीतकमी माझ्याकडून हव्या असलेल्या कागदपत्रांची यादी द्या, अशी देखील मागणी केली आहे.

हे ही वाचा:
…आणि दोघांनीही विभागून घेतले सुवर्णपदक

पूजा चव्हाण प्रकरणात मिळाला मोठा पुरावा! संजय राठोडांच्या अडचणीत वाढ?

मराठीचे खरे मारेकरी…ही पेंग्विन सेना!

भारतीय महिला हॉकीपटूंची ऐतिहासिक कामगिरी! उपांत्य फेरीत धडक

दरम्यान, या पत्रात नवा मुद्दा आहे तो म्हणजे ३ ऑगस्टला म्हणजेच उद्या अंतरिम दिलासा मिळावा यासाठी केलेल्या याचिकेवर सुनावणी आहे. त्यामुळे मी चौकशीला हजर राहू शकत नाही, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांनी त्यांच्या पत्रात ईडीच्या तपासावर आरोप केले आहेत. ईडीकडून केला जाणार तपास हा निष्पक्ष आणि न्याय्य नसल्याचं देशमुखांनी पत्रात म्हटलं आहे.अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा ईडीच्या समन्सला हुलकावणी दिली आहे. त्यांना समन्स देण्याची ही चौथी वेळ आहे.

Exit mobile version