मुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळ्याची ईडीकडून कसून तपासणी सुरू असून ईडीने मुंबई महापालिकेला एक पत्र पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ईडीकडून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना हे पत्र पाठवून माहिती मागवण्यात आली आहे. करोना काळातील खर्चांचे तपशील ईडीकडून मागविण्यात आले आहेत.
ईडीकडून मुंबई महानगरपालिकेला म्हणजेच महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून कोविड काळातील सर्व खर्चाचे तपशील कागदपत्रासहित मागविण्यात आले आहेत. तसेच लाईफलाईन कंपनीशी संबंधित मनी लॉड्रिंग प्रकरणाच्या तपासासाठी सर्व खर्चाची कागदपत्रेही मागविण्यात आली आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागवार खर्चाची माहितीही ईडीकडून मागविण्यात आली आहे. करोना काळात एकूण किती टेंडर काढण्यात आली? कोणकोणत्या कंत्राटदारांना दिली? आणि किती रुपयांना दिली? याचेही तपशील ईडीने मागविले आहेत. तसेच बँक डिटेल्स, टेंडरमधली माहिती आणि साहित्य याचीही माहिती ईडीने मागविली आहे.
करोना काळात जम्बो कोविड सेंटर प्रकरणात घोटाळा झाल्याच्या प्रकरणाचा तपास सध्या ईडीकडून सुरू आहे. ईडी या प्रकरणी अॅक्शन मोडमध्ये असून काही दिवसांपूर्वीचं ईडीने मुंबई आणि पुण्यात १५ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. यामध्ये आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण तसेच संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजित पाटकर यांच्या घरी देखील धाड टाकण्यात आली होती.
हे ही वाचा:
समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, २५ प्रवशांचा होरपळून मृत्यू
भारत- पाक सामन्यासाठी हॉटेलचे दर गगनाला भिडले
…हा तर स्वतःचे काळे कारनामे झाकण्यासाठी मुंबई महापालिकेवर मोर्चा
भारतातल्या परिचारिका का निवड करत आहेत जर्मनीची?
तसेच सूरच चव्हाण, आयएएस अधिकारी आणि महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजय जयस्वाल यांना ईडीने समन्स देखील बजावले होते. त्यानंतर संजय जयस्वाल ईडीच्या चौकाशीला सामोरे गेले असून यात आणखी अधिकारी रडारवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.