अविनाश भोसलेंची ४० कोटींची संपत्ती सील

अविनाश भोसलेंची ४० कोटींची संपत्ती सील

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या पुणे आणि नागपूर येथील ४० कोटी ३४ लाखाची संपत्ती ईडीने सोमवारी सील केली. अविनाश भोसले आणि त्याच्या कुटुंबीयांची परकीय चलन व्यवस्थापन अर्थात ‘फेमा’ कायदा अंतर्गत मागील काही वर्षांपासून ईडी चौकशी करीत आहे.

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आणि हॉटेल व्यवसायिक अविनाश भोसले यांच्याकडे विदेशी चलन प्रकरणी फेमा कायदा अंतर्गत मागील काही वर्षांपासून अंमलबजावणी संचलनालय (ईडी)कडून याप्रकरणाची चौकशी करण्यात येत होती. त्यांनी फेमा कायद्याचा भंग केल्यानंतर परदेशात गुंतवणूक केली. आता सील करण्यात आलेली जी संपत्ती आहे, तेवढीच संपत्ती त्यांनी दुबईत विकत घेतली आहे.

हे ही वाचा:

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; रेवदंडा किल्ल्याची तटबंदी ढासळली

फडणवीसांचा ई टेंडरिंगचा निर्णय ठाकरे सरकारने बदलला

मुख्यमंत्री म्हणून नव्हे; बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून चर्चा केली

१००० हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मौलानांना बेड्या

फेब्रुवारी महिन्यात ईडीकडून भोसले यांच्या पुण्यातील अबील हाऊस येथे छापा टाकला होता, तसेच नोव्हेंबर मध्ये भोसले यांची ईडीच्या कार्यालयात १० तास चौकशी करण्यात आली होती. दरम्यान त्याची कुटुंबातील काही सदस्यांची याप्रकरणात चौकशी करण्यात आली होती.

अविनाश भोसले याच्या विदेशी बँकेत ५०० कोटी कसे जमा झाले, हा पैसे आयबीच्या परवानगी विना जमा झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. सोमवारी ईडीने भोसले यांच्या पुणे आणि नागपूर येथील ४० कोटी ३४ लाखाचा संपत्तीवर टाच आणली करण्यात आली असल्याची माहिती ईडीने दिली आहे.

Exit mobile version