28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामाईडीचा काँग्रेसला दणका; संबंधित कंपन्यांची ७५१ कोटींची मालमत्ता जप्त

ईडीचा काँग्रेसला दणका; संबंधित कंपन्यांची ७५१ कोटींची मालमत्ता जप्त

असोसिएट जर्नल, यंग इंडियनवर कारवाई

Google News Follow

Related

ईडीने काँग्रेस पक्षाशी संबंधित असोसिएट जर्नल्स लि. आणि यंग इंडियन या संस्थांच्या जवळपास ७५१.९ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लॉन्डरिंग प्रकरणाशी संबंधित हे छापासत्र ईडीने टाकले आणि त्यात ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे. २०१४मध्ये केलेल्या तक्रारीनंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी करण्यास प्रारंभ केला होता.

 

दिल्ली न्यायालयाने या प्रकरणात यंग इंडियनसह सात आरोपींनी फसवणूक, अप्रामाणिकपणा, संपत्तीचा गैरवापर आणि कटकारस्थान आणि विश्वासघात केला असल्याचे शिक्कामोर्तब केले होते. यंग इंडियनच्या माध्यमातून असोसिएट जर्नलची कोट्यवधीची संपत्ती हस्तगत करण्याचा कट करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. वर्तमानपत्र प्रसिद्ध करण्यासाठी असोसिएट जर्नल्सला सवलतीच्या दरात जमीन मिळाली होती. पण २००८मध्ये या वर्तमानपत्राचे काम बंद झाले आणि नंतर ही जमीन व मालमत्ता व्यावसायिक कारणासाठी वापरली जाऊ लागली.

 

असोसिएट जर्नलने अखिल भारतीय काँग्रेसला ९०.२१ कोटींचे कर्ज फेडणे आवश्यक होते पण असोसिएट जर्नल्सकडून त्याची परतफेड होणार नाही, असे दाखवून काँग्रेसने ती कंपनी यंग इंडियनला ५० लाखात विकली. न्यायालयाने म्हटले की, यातून असोसिएट जर्नल्सचे भागधारक तसेच काँग्रेसला देणगी देणाऱ्यांची फसवणूक झाली. ही फसवणूक असोसिएट जर्नल्स तसेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

 

नॅशनल हेराल्ड प्रकरण काय आहे?

असोसिएट जर्नल्स लि.वर यंग इंडियनने ताबा मिळविणे हा या प्रकरणातील प्रमुख बिंदू आहे. १९३७मध्ये स्वातंत्र्यसैनिकांनी असोसिएट जर्नल्सची स्थापना केली होती. त्यामाध्यमातून नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्र प्रसिद्ध केले जात होते. त्यात कौमी आवाज आणि नवजीवन ही उर्दू आणि हिंदीतील वर्तमानपत्रेही प्रसिद्ध होत.  २००८मध्ये या वर्तमानपत्रांचे प्रकाशन थांबले. २०१०मध्ये असोसिएट जर्नल्सने काँग्रेसला ९० कोटी कर्जाची परतफेड करणे आवश्यक होते.

 

या असोसिएट जर्नल्सवर यंग इंडियन या नव्याने स्थापन झालेल्या कंपनीने ताबा घेतला. या कंपनीवर सुमन दुबे आणि सत्यन पित्रोडा (सॅम पित्रोडा) हे संचालक नेमण्यात आले. त्यानंतर राहुल गांधी यांचीही या कंपनीवर संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. काही दिवसांनी असोसिएट जर्नल्सचे सगळे कर्ज यंग इंडियनकडे हस्तांतरित करण्यात आले. सोनिया गांधी यांनी २०११मध्ये यंग इंडियन्सचे संचालकपद स्वीकारले. त्यातून सोनिया आणि राहुल गांधी यांच्याकडे यंग इंडियनचे ३६ टक्के समभाग होते. त्यानंतर यंग इंडियनने कोलकाताच्या आरपीजी समुहाकडून १ कोटींचे कर्ज घेतले. त्यानंतर केवळ ५० लाख देऊन असोसिएट जर्नल्सची सगळी संपत्ती यंग इंडियनच्या नावावर करण्यात आली. हा आरोप काँग्रेसने फेटाळला आहे.

 

हे ही वाचा:

गुजरात राज्याचा राज्य मासा म्हणून ‘घोळ’ माशाची निवड!

राम मंदिरातील पुजारी पदासाठी आले तब्बल ३ हजार अर्ज!

खर्गे म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी देशासाठी प्राण दिले’!

इस्रायलकडून युद्धविराम झाला नाही तर असेच होणार अपहरण!

 

वर्ल्डकप सामन्यावरून काँग्रेसची मोदींवर खालच्या भाषेत टीका

 

एकीकडे ही संपत्ती जप्त झाल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलेला असताना नरेंद्र मोदींवर वर्ल्डकपच्या निमित्ताने खालच्या भाषेत काँग्रेसने टीका केली आहे. राहुल गांधी यांनी राजस्थानमधील प्रचारसभेत नरेंद्र मोदी हे पनवती असून त्यांच्यामुळे आपण वर्ल्डकपचा अंतिम सामना गमावल्याचे अजब विधान केले. त्यावरून भाजपानेही राहुल गांधी यांना लक्ष्य केले असून राहुल गांधी काय बोलत आहेत हे त्यांचे त्यांना तरी कळते का, असा सवाल भाजपाकडून विचारण्यात आला आहे. देशाच्या पंतप्रधानांबद्दल खालच्या भाषेत टीका करताना काँग्रेसला काहीही कसे वाटत नाही, असा प्रश्नही भाजपाने विचारला आहे.

वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर अहमदाबाद येथे सामना का खेळविला, मुंबई, चेन्नई, दिल्लीत तो खेळवता आला नसता का, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला तर ठाकरे गटाच्या खासदार प्रियांक चतुर्वेदी यांनी मोदींनी भारतीय खेळाडूंची ड्रेसिंग रूममध्ये जाऊन भेट कशाला घेतली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यामुळे विरोधकांमुळे प्रचंड निराशा असल्याचे चित्र गेल्या काही दिवसात दिसले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा