अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी फोन पे, फोन पे, गूगल पे, अमेझॉन , एचडीएफसी बँक , आयसीआय सीआय बँक , धनलक्ष्मी बँक आणि इतर कंपन्यांच्या बेंगळुरूमधील कार्यालयांवर छापे टाकले. अर्धवेळ नोकरीच्या घोटाळ्याच्या संदर्भात देशातील लाखो लोकांना फसवलेल्या प्रकरणी हे छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यांमध्ये या सर्व कंपन्यांच्या ८० बँक खात्यांमधून एक कोटी रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी गेल्या महिनाभरातील ईडीची ही दुसरी कारवाई आहे.
या प्रकरणी ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी सुपर लाईक नावाचे ऍप बाजारात आले होते. कंपनीने दावा केला आहे की या ऍपच्या माध्यमातून लोकांना घरी बसून पार्ट टाइम जॉब केल्याप्रमाणे जास्त पैसे मिळतील. यासाठी लोकांना कंपनीच्या ऍपवर नोंदणी करून काही पैसे भरण्यास सांगण्यात आले. यासोबतच त्या ऍपवर कंपनीकडून अनेक सेलिब्रिटींचे फोटोही शेअर केले जात होते.
हे ही वाचा :
कर्नाटक सरकारचा ‘गो रक्षणा’साठी मोठा निर्णय
मनसे उधळणार राहुल गांधींची शेगावमधील सभा
भारतात येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ
आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रकल्पांना स्थगिती
कंपनी संबंधित ग्राहकाला या चित्रांवर कमेंट शेअर करण्यासाठी आणि त्यांची जाहिरात करण्यासाठी पैसे देत होती. सुरुवातीच्या टप्प्यात या ऍपद्वारे ग्राहकांना पैसे दिले जात होते. मात्र, कालांतराने ऍपने ग्राहकांना पैसे देणे बंद केले आणि नोंदणीच्या वेळी ऍपमध्ये भरलेले पैसे ग्राहकांना परत केले गेले नाहीत. या प्रकरणी दक्षिण बेंगळुरू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा घोटाळा देशभर असल्याचे समोर आल्यानंतर ईडी त्याची चौकशी करत आहे.