ईडीच्या छापासत्राचा रोख आता वक्फ बोर्डाकडे वळला आहे. सक्तवसुली संचालनालयाने पुण्यातील सात ठिकाणी गुरुवारी छापे टाकले. हे प्रकरण वक्फ बोर्डाशी संबंधित असलेल्या जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीशी संबंधित आहे, असे कळते. सध्या आरोपांची राळ उडविणाऱ्या नवाब मलिक यांच्या अखत्यारितील मंत्रालयाच्या अंतर्गत हे वक्फ बोर्ड येते.
यासंदर्भात नवाब मलिक लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत त्यामुळे आता नवाब मलिक आणि ईडी यांच्यातला संघर्ष आता पाहायला मिळणार आहे.
ईडीकडून महाराष्ट्रात विविध ठिकाणी कारवाई केली जात आहे. वक्फ बोर्डाशी संबंधित संपत्ती व जमिनी अवैध मार्गाने विकल्याच्या आरोपावरून या कारवाया होत असल्याचे कळते. नवाब मलिक यांच्या अखत्यारितील मंत्रालयाअंतर्गत वक्फ बोर्ड येत असल्यामुळे मलिक आता वेगळ्या कारणामुळे लक्ष्य ठरणार आहेत.
हे ही वाचा:
राज ठाकरे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देऊ पण…
WHO: सगळीकडे कोविड केसेस कमी, अपवाद फक्त…
अर्धनग्न एसटी कर्मचाऱ्यांनी केले ठाकरे सरकारला पूर्णनग्न
“मलिक, ४८ तासात पत्रकार परिषद घेऊन माफी मागा अन्यथा…”
शाहरुख खान पुत्र आर्यन खान याला अटक केल्यापासून नवाब मलिक हे आक्रमक झाले असून त्यांनी सातत्याने पत्रकार परिषदा घेत प्रारंभी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर शरसंधान केले होते. पण आता त्यांचा रोख भाजपाच्या नेत्यांवर आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर मलिक यांनी गंभीर आरोप केल्यावर फडणवीस यांनीही त्यांच्या जमीन व्यवहाराचे प्रकरण समोर आणत मलिक यांचा अंडरवर्ल्डशी कसा संबंध आहे, हे जाहीर केले. त्यावरून फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा मलिक यांनी आरोप केले. तेव्हा फडणवीस यांनी डुकराची उपमा देत एक ट्विट केले होते.