मालेगावमधील बँकेत बेनामी हवालाद्वारे वेगवेगळ्या खात्यांमध्ये १२५ कोटी रुपये आले आणि नंतर हे पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये हस्तांतरित केले गेल्याची बाब समोर आली होती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत या प्रकरणात दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिराज मोहम्मद आणि नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक निकम या दोघांना अटक झाली आहे. यानंतर आता या प्रकरणी ईडीने छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे.
मालेगाव व्होट जिहाद फंडिंग स्कॅम प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिराज मोहम्मद याच्याशी संबंधित २४ हून अधिक ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. ईडीकडून ही कारवाई महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सुरू आहे. नाशिकमधील मर्कटाईल बँकेतील खात्यांशी संबंधित ही छापेमारी सुरू आहे. आरोपी सिराज मोहम्मदचे २४ बेनामी बँक अकाऊंट मालेगावच्या नाशिक मर्चंट बँक आणि महाराष्ट्र बँकेत सापडले होते.
"Malegaon Vote Jihad Funding Scam"
ED conducting Raids at two dozens places connected with Siraj Mohammad
@BJP4India @Dev_Fadnavis @mieknathshinde
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 14, 2024
व्होट जिहादच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी देण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. मालेगाव बँकेत बेहिशोबी १२५ कोटी रुपये आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. १२५ कोटी रुपये विविध बँक खात्यात जमा होऊन तो पैसा विविध खात्यात हस्तांतरीत केल्याचा आणि रोख रक्कम वाटल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केली. तर यापूर्वी मालेगावमध्ये २५० कोटी रुपयांची बेहिशोबी रक्कम आल्याचे समोर आले होते. हवाला रॅकेटद्वारे ही रक्कम येत असल्याचे समोर आले होते.
हे ही वाचा :
एनआयएकडून गैर-स्थानिकांच्या हत्येमधील दहशतवाद्याची मालमत्ता जप्त
‘व्होट जिहाद’चा पर्दाफार्श: मालेगावच्या बँकेत १२५ कोटींचे व्यवहार; दोघांच्या आवळल्या मुसक्या
राजस्थान: मतदान अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून राडा; ६० जणांना अटक
झारखंड निवडणूक; पहिल्या टप्प्यात ६४ टक्के मतदान!
एका महिन्यात देशभरातील २०० बँक खात्यातून २५०० व्यवहार झाले. मालेगाव येथील सिराज अहमद आणि मोईन खान यांनी गरीब लोकांच्या नावाने बँक खाती उघडली. त्यात चार दिवसांत १२५ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यातील ३७ खात्यातील जमा रक्कम रोखीत बदलण्यात आली आणि ही रक्कम लागलीच काढण्यात आली.