रोहित पवारांच्या बारामती ऍग्रोवर ईडीचे छापे

महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी छापेमारी

रोहित पवारांच्या बारामती ऍग्रोवर ईडीचे छापे

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कंपनीवर ईडीने शुक्रवार, ५ जानेवारी रोजी छापेमारी केली आहे. बारामती ऍग्रोच्या सहा ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे.

रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोवर या कंपन्यांच्या सहा ठिकाणच्या कार्यालयावर एकाचवेळी छापेमारी करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून ही छापेमारी करण्यात येत आहे. पुणे, बारामती, पिंपळी आणि छत्रपती संभाजीनगरसहीत सहा ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. रोहित पवार हे बारामती ऍग्रोचे सीईओ आहेत. त्यांचे बारामती आणि हडपसर येथे कार्यालय आहे. या दोन्ही ठिकाणी अधिकाऱ्यांकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची छाननी केली जात आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या छापेमारीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या काही तक्रारी असतात त्यानुसार छापेमारी होत असते. कुणाचीही तक्रार आली की त्यावर तपास होतो. महाविकास आघाडीच्या काळात आमच्याही चौकश्या झाल्या. चौकश्या होत असल्याने घाबरून जायचं नसतं. ज्यांच्यावर छापे पडले त्यांनी योग्य कागदपत्रे दिली आणि मांडणी केली तर पुढे काही होत नाही, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हे ही वाचा:

महालक्ष्मी रेसकोर्सवर डोळा नेमका कोणाचा?

पुन्हा ईव्हीएम हॅक होतेय, अब की बार ४०० पार…

अदानींना ‘सर्वोच्च’ दिलासा; हिंडेनबर्ग प्रकरणचा तपास सेबीकडेच

रामनगरी होणार अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र

आमदार रोहित पवार हे सध्या परदेशात गेलेले आहेत. छापेमारी झाल्याचं कळल्यानंतर रोहित पवार यांनी महापुरुषांचे फोटो पोस्ट करत ट्विट केलं आहे. “हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा… ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला… अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल,” असं सूचक ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

Exit mobile version