29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामाइंडिया बुल्सच्या मुंबई, दिल्लीतील कार्यालयांवर ईडीचे छापे

इंडिया बुल्सच्या मुंबई, दिल्लीतील कार्यालयांवर ईडीचे छापे

Google News Follow

Related

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) इंडियाबुल्स ग्रुपवर छापा टाकला आहे. ईडीने मुंबईतील इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सच्या कार्यालयात ही कारवाई केली आहे. या प्रकरणात, कंपनीवर आधीच चुकीच्या पद्धतीने शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप आहे.

इंडियाबुल्सच्या अनेक अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले असून आज त्यांनी छापे टाकले आहेत. पण, याविरोधात इंडियाबुल्स दिल्ली उच्च न्यायालयात गेली आहे. येथून कंपनीला दिलासा अपेक्षित आहे.

ईडीचे छापे सकाळपासूनच सुरू झाले होते. मुंबई आणि पुण्यात छापे टाकले जात आहेत. हे प्रकरण गेल्या वर्षीचे आहे. गेल्या वर्षी, ईडीने पालघर अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल (ECIR) दाखल केला होता. पालघरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये तक्रारदाराने आरोप केला आहे की, इंडियाबुल्सने त्यांच्या काही खाजगी व्यक्तींना कर्ज दिले आहे आणि कर्जाची रक्कम स्वतःच्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढवण्यासाठी वापरली जात आहे.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, ईडीने हे प्रकरण हाती घेतले, परंतु कोविडमुळे प्रकरण पुढे जाऊ शकले नाही. नुकतेच इंडियाबुल्सच्या अनेक अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले असून आज त्यांनी छापे टाकले आहेत. पण, याविरोधात इंडियाबुल्स दिल्ली उच्च न्यायालयात गेली असून तेथून कंपनीला दिलासा अपेक्षित आहे.

हे ही वाचा:

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची कर्नाटकमध्ये हत्या

नाशिक महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकवा

झारखंड सरकारचे उर्दू प्रेम उफाळले; भोजपुरी, माघी भाषा वगळल्या

लालूप्रसाद यादवांच्या शिक्षेवर आज सुनावणी

ईडी पथकाने सकाळपासून मुंबईतील इंडियाबुल्सच्या मुख्य कार्यालयासह सात ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये पुण्यातील एका चित्रपट निर्मात्याच्या घराची आणि कार्यालयाचीही ईडीची टीम झडती घेत आहे. झडतीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.  त्यामुळे ईडीचा शोध अजूनही सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा