दाऊदची बहीण हसिना पारकरच्या मालमत्तेवर ईडीची धाड

दाऊदची बहीण हसिना पारकरच्या मालमत्तेवर ईडीची धाड

मुंबईत ईडीकडून मंगळवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांच्या जागांवर छापे टाकण्यात येत आहेत. मुंबईतील मोठे नेते देखील ईडीच्या रडारवर असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईच नाही तर दिल्लीतून देखील तपास पथके मुंबईत आल्याचे वृत्त आहे. डी गॅंग संबंधित ही कारवाई सुरू आहे.

दाऊद इकबाल कासकर आणि हसिना पारकर यांच्याशी संबंधीत काही मालमत्तांवर ही कारवाई सुरू असल्याचे वृत्त आहे. दाऊद हिची बहिण हसिना पारकर हिच्या घरी आता ईडीचे पथक पोहचले असल्याचे वृत्त आहे.

संपत्ती कराराबाबत ईडीने मुंबईतील सी वॉर्डमध्ये जवळपास दहा जागांवर या धाडी टाकल्या जात असून अंडरवर्ल्डचा या करारामध्ये पैसा असल्याचा संशय आहे. ईडी आणि एनआयएला ठोस पुरावे मिळाल्याने या धाडी टाकल्या जात आहेत. यामध्ये मोठ्या राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचीही माहिती आहे.

हे ही वाचा:

साईनगर शिर्डी दहशतवाद्यांच्या रडारवर

शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास

‘काँग्रेसचे आंदोलन म्हणजे नाना पटोलेंची नौटंकी’

नाना पटोलेंचे आंदोलन पोलिसांनी गुंडाळले

आज शिवसेनेची पत्रकार परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषेदत काही मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा शिवसेनेनं दिला आहे. त्यापूर्वी ईडीकडून ही मोठी कारवाई होत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Exit mobile version