अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने बांगलादेशींच्या भारतात घुसखोरी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ईडीने मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी झारखंड आणि पश्चिम बंगालमधील १७ ठिकाणी बांगलादेशी नागरिकांच्या बेकायदेशीर घुसखोरीच्या मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात छापे टाकले आहेत.
काही बांगलादेशी आणि रोहिंग्या मुलींची शेजारच्या देशातून झारखंडमध्ये तस्करी केल्याबद्दल रांची येथील बरियातू पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे फेडरल एजन्सीने सप्टेंबरमध्ये पीएमएलए खटला दाखल केला होता. मुलींनी आधारसह ओळखीची कागदपत्रे हिंदू नावाने मिळवल्याचा आरोप आहे. एजन्सीने या प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या दृष्टीने तपास करण्यासाठी १७ ठिकाणी छापे टाकले आहेत. झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये हे छापे टाकण्यात आले आहेत. ईडी झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये कार्यरत असलेल्या एका मोठ्या सिंडिकेटची चौकशी करत आहे जे बेकायदेशीर घुसखोरीला मदत करत आहे.
The Enforcement Directorate is carrying out raids at more than a dozen locations across Jharkhand and West Bengal in connection with a money laundering case linked to Bangladeshi infiltration: Sources
— ANI (@ANI) November 12, 2024
झारखंडमध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अवैध घुसखोरी हा चर्चेचा मुद्दा बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबरमध्ये एका रॅलीला संबोधित करताना झारखंड मुक्ती मोर्चाच्या (जेएमएम) नेतृत्वाखालील आघाडी सरकारवर बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना व्होट बँकेच्या राजकारणासाठी समर्थन देत असल्याचा आरोप केला होता. गृहमंत्री अमित शाह यांनीही आरोप केला आहे की, आदिवासी लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. तसेच बांगलादेशी स्थलांतरित आदिवासी मुलींशी खोट्या बहाण्याने लग्न करून आदिवासींच्या जमिनी बळकावतात. भाजप सरकार प्रत्येक घुसखोराची ओळख पटवून हद्दपार करेल आणि आदिवासी लोकांची त्यांनी बळकावलेली जमीन परत घेईल, असे आश्वासन भाजपाने दिले आहे.
हे ही वाचा:
नवी मुंबईमधील रो-हाऊसमधून पोलिसांच्या हाती लागले अडीच कोटींचे घबाड
उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय, राहिलाय तो खान
राहुल गांधी चुxया बनवतोय ! फेक नरेटीव्हचा ‘प्रकाश आंबेडकरी’ अनुवाद…
आदिवासी मुलींशी लग्न करणाऱ्या घुसखोरांना आता जमीन मिळणार नाही!
दरम्यान, झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. बुधवार, १३ नोव्हेंबर रोजी ४३ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. तर, २० नोव्हेंबरला ३८ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.