क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज वझीरएक्स’ची ईडीने तब्बल ६४ कोटींची बँक मालमत्ता गोठवली आहे. क्रिप्टो एक्सचेंजच्या विरोधात एजन्सीची ही तपासणी भारतात कार्यरत असलेल्या अनेक चिनी लोन अँप्स विरुद्ध सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने आहे. एजन्सीने वझीरएक्सवर गेल्या वर्षी परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.
ईडीने वझीरएक्सची ६४.६७ कोटी रुपयांची ठेवी गोठवली असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीचे संचालक समीर म्हात्रे यांच्या ठिकाणी काल, ५ ऑगस्टला ईडीने छापा टाकला. तपास सुरू झाल्यानंतर त्यांनी क्रिप्टो मालमत्तेत गुंतवणूक केली आणि परदेशात पैसे पाठवून आपला नफा वाढवला, अशी माहिती म्हात्रे यांनी दिली आहे. मात्र, कंपनीबद्दल याप्रकरणी उघडपणे म्हात्रे काहीही बोलले नाहीत, असे ईडीने म्हटले आहे. वझीरएक्स वर ‘पीएमएलए’ कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
ED searches the Director of WazirX Crypto-Currency Exchange & freezes its Bank assets worth Rs 64.67 Crore for assisting accused Instant Loan APP Companies in laundering of fraud money via purchase & transfer of virtual crypto assets.
— ED (@dir_ed) August 5, 2022
ईडीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चीनच्या ऑनलाइन किंवा इन्स्टंट लोन अप्सचा झालेला नफा त्यांनी क्रिप्टोमध्ये बदलला आहे. यामध्ये फिनटेक कंपन्यांचा समावेश आहे ज्यांना कर्ज-व्यापार परवाना नाकारण्यात आला होता.
अनेक इन्स्टंट लोन अँप्स किंवा फिनटेक भागीदार रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत असून, ग्राहकांना कर्जाचे उच्च व्याजदर आकारत आहेत.
हे ही वाचा:
केसरकर म्हणतात, तेव्हा उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते
मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर
सायबर गुन्हेगारांचं ‘लक्ष्य’ विद्यार्थ्यांवर
तसेच या लोन कंपन्या ग्राहकांच्या माहीतीचा गैरफायदा घेत असून, याबाबत भारतात तक्रारी वाढत चालल्या आहेत. त्यामुळे ईडीने याचा तपास सुरू केला आहे. हा तपास सुरू झाल्यापासून, फिनटेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात मिळवलेला नफा क्रिप्टो मालमत्ता खरेदी करण्याकडे वळवला आहे. तसेच बेकायदेशीररित्या परदेशात पैसा पाठवला आहे. लोन अँप्सच्या माध्यमातून मिळालेला निधी हा मोठ्या प्रमाणात ‘वझीरएक्स’ एक्सचेंजमध्ये वळवण्यात आला आणि खरेदी केलेली क्रिप्टो मालमत्ता परदेशात पाठवण्यात आल्याचे आढळून आल्याचे ईडीने म्हटले आहे.