दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी मोठी कारवाई केली आहे. दिल्ली-एनसीआरसह पंजाब आणि हैदराबादमधील ३५ ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात ईडीने छापे टाकले होते. यादरम्यान ईडीने दोन जणांना अटकही केली होती.
ईडीची ही कारवाई मद्य वितरक, कंपन्या आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांवर करण्यात येत आहे. यापूर्वी ईडीने १०३ ठिकाणी छापे टाकले होते. दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिल्ली मद्य धोरण २०२१-२२ च्या अंमलबजावणीतील अनियमिततेची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. त्याचबरोबर या प्रकरणी आतापर्यंत ११ उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे.
Enforcement Directorate (ED) is carrying out searches at nearly three dozen locations in Delhi and Punjab in connection with Delhi Excise Policy case. pic.twitter.com/TfIcX5rx2J
— ANI (@ANI) October 7, 2022
या घोटाळ्याबाबत ईडीने २८ सप्टेंबर रोजी छापा टाकला होता. यावेळी इंडोस्पिरिट या दारू निर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय समीर महंद्रू यांनाही अटक केली आहे. ईडीच्या अहवालानुसार, महेंद्रूने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निकटवर्तीयांना दारू धोरण तयार करण्यात आणि धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याबद्दल मोठी रक्कम दिली होती. याप्रकरणी मनीष सिसोदिया यांची चौकशी सुरु आहे.
हे ही वाचा:
सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन
मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त
उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने अमित बनून हिंदू मुलीवर केला बलात्कार
दरम्यान, ६ सप्टेबर रोजी ईडीने दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी तीसहून अधिक ठिकाणी छापेमारी केली होती. याशिवाय लखनऊ, पंजाब, हरियाणा, तेलंगण व मुंबईतीलही अनेक मद्य व्यावसायिकांच्या ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या.