पत्राचाळ घाेटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने मुंबईत पुन्हा आणखी काही ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती मिळत आहे. परंतु ही छापेमारी नेमकी काेणत्या ठिकाणी सुरू आहे हे स्पष्ट हाेऊ शकलेले नाही. पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे सध्या न्यायालयीन काेठडी भाेगत आहे. या नव्या सर्च ऑपरेेशनमुळे संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ हाेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पत्राचाळ पुनर्विकासातील आर्थिक घाेटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या १६तासांच्या चाैकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर अंमलबजावाणी संचालनायालने मारलेल्या छाप्यामध्ये ११.५ लाख रुपयांची राेकडही जप्त करण्यात आली हाेती. पत्राचाळ घाेटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन काेठडी सुनावणी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन काेठडी भाेगत असतानाच याच प्रकरणासंदर्भात त्यांची पत्नी वर्षा राऊत यांनाही चाैकशीसाठी ईडी कार्यालयात बाेलावण्यात आले हाेते.
हे ही वाचा:
ट्रक- कारच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू
राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच मलिक, देशमुखांच्या सोबतीला
विरोधी पक्षांना ‘वंदे मातरम’ची ऍलर्जी
या आधी ईडीने पत्राचाळ प्रकरणी केलेल्या छापेमारीत काही महत्वाचे दस्तऐवज सापडले हाेते. ईडीची बुधवारी सकाळपासून छापेमारी सुरू आहे. या छापेमारीत नगरसेवकही रडावर असल्याचं म्हटले जात आहे. परंतु आजच्या कारवाई बाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेलं नाही. राऊत यांची न्यायालयीन काेठडी ४ ऑगस्टला संपणार असली तरी वाढवून देण्याची मागणी हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अटकेप्रकरणी जाेपर्यंत जामिन अर्ज करून त्यावर सुनावणी हाेत नाही ताेपर्यंत ईडीची कारवाई सुरू राहणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.