बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव तसेच लालू यादव यांच्या मुलींच्या घरावर ईडीने टाकलेल्या धाडीत बरीच संपत्ती हाती आली आहे. त्यात काही रोकड, सोने आणि परकीय चलन यांचा समावेश आहे.
ईडी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात सांगितले आहे की, दिल्ली एनसीआर, बिहार आणि झारखंड अशा ठिकाणी २४ जागी ही छापेमारी करण्यात आली आहे. त्याशिवाय, लालू यादव यांच्या तीन मुलींच्या घरावरही छापेमारी करण्यात आली आहे. त्यात रागिणी यादव, चंदा यादव व हेमा यादव यांचा समावेश आहे. याआधी, लालू यादव यांचे निकटवर्ती आरजेडीचे नेते अबू दुजाना यांच्या घरावरही छापेमारीही झाली होती.
हे ही वाचा:
कांदिवलीच्या समतानगर ‘एकदुजे के लिए’; प्रेमी युुगुलाने उचलले हे पाऊल
सदानंद कदम ईडीच्या ताब्यात.. लवकरच न्यायालयात हजर करणार
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘टॉप’
थर्ड गिअर..२.९२ लाख कार्सची विक्री
तेजस्वी यादव यांच्यासह लालू यादव यांच्या मुलींच्या घरावर मारलेल्या छापेमारीत ७० लाख रुपये रोख, २ किलो सोने आणि ९०० अमेरिकन डॉलर इतकी संपत्ती सापडली. सोन्यामध्ये १.५० किलो दागिने आहेत तर ५४० ग्रॅम सोन्याची नाणी आहेत.
जॉब फॉर लँड स्कॅममुळे ही कारवाई करण्यात आली होती. तेजस्वी यादव यांची पत्नी सध्या रुग्णालयात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची पत्नी गरोदर असून तिला या सगळ्या प्रकारामुळे त्रास झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
सीबीआयने सोमवारी माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची चौकशी केली होती. त्याच्या आदल्या दिवशी दिल्लीत लालू यादव यांची मुलगी मिसा भारती यांच्या घरी लालू यादव यांची चौकशी केली होती.
गेल्या वर्षी मे महिन्यात सीबीआयने नोकरीच्या बदल्यात जमीन या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात लालू यादव यांचे निकटवर्ती भोला यादव यांना अटक केली होती. ऑक्टोबर महिन्यात सीबीआयने लालू यादव, मिसा भारती, राबडी देवी अशा १६ लोकांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयचा आरोप आहे की, पाटण्यात जवळपास १ लाख स्क्वेअर फूट इतकी जमीन आपल्या कब्जात घेतली आहे.