चिनी कंपनी विवोवर ईडीची मोठी कारवाई

चिनी कंपनी विवोवर ईडीची मोठी कारवाई

चीनची मोबाईल कंपनी विवो आणि त्या कंपनीशी संबंधित कंपन्यांनावर ईडीने छापे टाकले आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईडीने ही छापेमारी केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सीबीआयही तपास करत आहे.

मंगळवार,५ जुलै रोजी सकाळपासून या मोबाईल कंपन्यांवर ईडी छापे टाकत आहे. चीनची मोबाइल निर्माता कंपनी विवो आणि त्याच्याशी संबंधित काही इतर कंपन्यांवर भारतातील ४४ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. छापेमारीदरम्यान आवश्यक कागदपत्रे तपासली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

‘लक्ष्य ऑलम्पिक मिशन’ सदस्य समितीमध्ये आमदार आशिष शेलार यांची नियुक्ती

‘काली’ चित्रपटाच्या पोस्टरवरून वाद

शिकागोमधल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री शिंदे ऍक्शन मोडमध्ये; पेट्रोलवरचा व्हॅट कमी करण्याची घोषणा

एप्रिलमध्ये सुद्धा ईडीने रेडमी आणि एमआय हे मोबाईल फोन बनवणारी शाओमी चिनी कंपनीची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर ईडीने ही कारवाई केली. शाओमीची ईडीने ५ हजार ३५१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. मे महिन्यात ZTE Corp. आणि विवो या चिनी विरोधात कंपन्यांना आर्थिक अनियमिततेमुळे चौकशीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आज विवो आणि त्याच्याशी संबंधित देशभरातील ४४ ठिकाणी ईडीकडून छापेमारे करण्यात आली आहे.भारताने २०० हुन अधिक चिनी मोबाईल अँप्सवर बंदी घातली आहे.

Exit mobile version