32 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामाघरातच सापडलेल्या मुलचंदानीला अखेर अटक

घरातच सापडलेल्या मुलचंदानीला अखेर अटक

रोख रक्कम, हिऱ्याचे दागिने आणि गाड्या सुद्धा जप्त

Google News Follow

Related

बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे अंमलबजावणी संचालयाने पुणे जिल्ह्यात खूप मोठी कारवाई करत छापेमारी केली आहे. या प्रकरणात अमर मूलचंदानी यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.  सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानी यांच्याकडे २७ जानेवारी रोजी ईडीने छापेमारी केली होती. त्यावेळी त्यांच्या तपासात अमर मूलचंदानी यांच्या दोन्ही भावाने आणि मुलाने सहकार्य केले नाही.  उलट पुरावा  नष्ट करायचा प्रयन्त केला.  या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अमर मलचंदानी, अशोक मुलचंदानी, मनोहर मूलचंदानी, दया मूलचंदानी, साधना मूलचंदानी व सागर मूलचंदानी अशा सहा जणांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांची पोलीस कोठडी मागितली.होती पण न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

घरी सापडले घबाड
ईडीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी ७२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे आणि हिऱ्यांचे दगिने , ४१ लाख रुपये रोख रक्कम मूलचंदानी यांच्या घरी मिळाली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दागिने ,रोख रक्कम आणि त्यांच्या चार अलिशान गाड्याही जप्त केल्या आहेत.

ईडीने दिली फिर्याद
ईडीचे सहायक संचालक सुधांशू श्रीवास्तव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याप्रमाणे ईडी अधिकाऱ्यांनी घरात प्रवेश केल्यावर सुमारे साडे आठ तास अमर मुलचंदानी वरील मजल्याच्या खोलीत लपून बसला होता. त्याने अनेक पुरावे नष्ट केल्याचे ईडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

काय आहे प्रकरण
सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे १२४ बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. या प्रकरणात जवळपास ४३० कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केले गेले. ज्या व्यक्तींची कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती, त्यांना सुद्धा कर्ज दिले गेले. कर्ज देताना परतफेडीची क्षमता व अन्य निकष तपासले गेले नाहीत म्हणूनच यामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले. सहकार सहआयुक्त राजेश जाधवर यांनी २०२० मध्ये या कर्जांविषयीचे ऑडिट केले होते. त्यानंतर हा घोटाळा उघडकीसआला होता . या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी अमर मूलचंद यांच्यासह पाच जणांना अटक केली होती.

हे ही वाचा:

माझ्या हत्येचा कट  रचला जात आहे

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

इंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा “लाल”

हवाई अभ्यासच्यावेळी सुखोई – मिराज विमाने हवेत धडक

जेरुसलेमच्या प्रार्थनास्थळात घुसुन दहशत वाद्यांचा गोळीबार

नुकतेच आले होते जामिनावर बाहेर
अटकेत असलेले अमर मूलचंदानी काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आले. त्यानंतर आज ईडीने छापा त्यांच्या घरावर छापा टाकला. बँकेवर आरबीआयने प्रशासक नेमला आहे. या बँकेत हजारो ठेविदारांचा कोट्यवधींचा पैसा अडकून पडला आहे.

घरातच लपला होता मूलचंदानी
ईडीचे अधिकारी छापेमारीस आले तेव्हा अमर मूलचंदानी यांच्या नातेवाईकांनी त्यांना घरात येण्यास अटकाव केला. पण त्यानंतर सीआरपीएफ अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले. अमर मूलचंदानी घरी नसल्याचे त्यांना सांगण्यात आले होते . परंतु ईडीच्या अधिकाऱ्यांनी घराची बारकाईने तपासणी केली.असता त्यावेळी एका खोलीत अमर मूलचंदानी लपून बसलेले सापडले. त्या खोलीला बाहेरुन कडी लावण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा