जॅकलिनला फसवणाऱ्याचे तुरुंगातून फोन

जॅकलिनला फसवणाऱ्याचे तुरुंगातून फोन

ईडीने सुकेश प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची चौकशी केली आहे. जॅकलीनची चौकशी ईडीने पीडित म्हणून केली आहे. सुकेश जॅकलिनला तिहार जेलमधून कॉलर आयडी स्पूफिंगद्वारे फोन करायचा आणि या काळात त्याने आपली ओळखही लपवून ठेवली. तो बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना फसवण्याचा प्रयत्न करत होता. सुकेशवर सुमारे २०० कोटी रुपयांची फसवणूक आणि खंडणीचा आरोप आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी (अंमलबजावणी संचालनालय) जॅकलीनची दिल्लीत ५ तासापासून चौकशी करत आहे. अहवालांनुसार, हा खटला सुकेश चंद्रशेखरशी संबंधित आहे, ज्याच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा आधीच नोंदवण्यात आला आहे. रोहिणी तुरुंगात अंडर ट्रायल सुकेशवर एका व्यावसायिकाकडून एका वर्षात २०० कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. याशिवाय सुकेशच्या विरोधात खंडणीच्या २० स्वतंत्र तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

जॅकलीन सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. सध्या ती भूत पोलीस या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर आणि एक गाणे रिलीज करण्यात आले आहे आणि दोन्हीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात जॅकलिनसोबत अर्जुन कपूर, सैफ अली खान आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत.

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाड बारावा खेळाडू

तुम्ही आराम करा, काळजी घ्या, बाकीचं आम्ही बघतो

काश्मीरही काफ़िरांपासून ‘मुक्त’ करा

गौतम अदानींच्या संपत्तीत वाढ

बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी जॅकलिन श्रीलंकेहून आली होती. २००९ मध्ये जॅकलिनने अलादीन या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात जॅकलिनसोबत रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही, पण अभिनेत्रीच्या सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर, ‘जाने कहा से आयी है’ या चित्रपटात दिसली. तथापि जॅकलिनला हाऊसफुल चित्रपटातील धन्नो गाण्यामुळे लोकप्रियता मिळाली. यानंतर मर्डर २ मध्ये जॅकलिनने तिच्या हॉट अवताराने सर्वांना हैराण केले. त्यानंतर जॅकलिनच्या करिअरचा आलेख वाढतच गेला. यानंतर जॅकलिनने हाऊसफुल २, रेस २, किक सारखे हिट चित्रपट दिले.

Exit mobile version