बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. गौरी खान हिला ईडीने नोटीस पाठवली आहे. गौरी खान ब्रँड ऍम्बेसेडर असलेल्या तुलसियानी ग्रुपवर गुंतवणुकदार आणि बँकांना सुमारे ३० कोटींचा गंडा घातल्याचा आरोप गौरी हिच्यावर लावण्यात आला आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानला ईडीने नोटीस पाठवली आहे. गौरी खान ही लखनऊमध्ये असलेल्या रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपची ब्रँड ऍम्बेसेडर आहे. या कंपनीवर गुंतवणूकदार आणि बँकांना अंदाजे ३० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. गौरी खानही या कंपनीच्या चाकोरीत येत आहे. त्यामुळे ईडीने ही कारवाई केली आहे.
रियल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुप प्रकरणामुळे गौरी खान चर्चेत आहे. या तुलसियानी ग्रुपची गौरी खान ब्रांड ऍम्बेसेडर आहे. ३० कोटींचा गंडा घातल्याचा आरोप गौरीवर करण्यात आला आहे. गौरी खान मुख्य आरोपी नसली तरी ती या प्रकरणाचा भाग आहे. गौरीने अद्याप या प्रकरणावर काहीही भाष्य केलेलं नाही.
नेमकं प्रकरण काय?
लखनऊमध्ये सुशांत गोल्फ सिटीमध्ये तुलसियानी ग्रुपचा एक प्रोजेक्ट आहे. मुंबईचे रहिवासी असलेल्या किरीट जसवंत शहा यांनी या प्रकल्पात २०१५ साली ८५ लाख रुपयांना फ्लॅट खरेदी केला होता. मात्र, अद्यापही कंपनीने त्यांना ना ताबा दिला आहे ना ही रक्कम परत केली आहे. त्यामुळे जसवंत शहा यांनी तुलसियानी समूहाचे संचालक अनिल कुमार तुलसियानी, महेश तुलसियानी आणि गौरी खान यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गौरी खानवर आरोप करत किरीट जसवंत शाह म्हणाले की, “गौरी खाननेच तुलसियानी ग्रुप प्रोजेक्टचा प्रचार केला होता. गौरी खानवर विश्वास ठेवत मी ही प्रॉपर्टी विकत घेतली होती. पण मेहनतीच्या पैशांनी विकत घेतलेला फ्लॅट अद्याप मला मिळालेला नाही. या प्रकरणी गौरी खानची चौकशी होणार आहे.”
हे ही वाचा:
यवतमाळमध्ये जावयाने पत्नी, सासरा आणि दोन मेहुण्यांना संपवलं
राहुल गांधींचा पत्ता कट, ममता म्हणतात खरगे पंतप्रधानपदाचा चेहरा!
नोटांवर एका माणसाचाच फोटो का? सावरकर,टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे फोटो कधी येणार?
तामिळनाडूत पुरामुळे हाहाःकार; रेल्वे स्थानकावर ८०० प्रवासी अडकले
गौरी खान २०१५ साली ‘तुलसियानी कन्स्ट्रक्शन ऍन्ड डेव्हलपर्स लिमिटेड’ या कंपनीची ब्रँड ऍम्बेसेडर होती. त्यावेळी त्यांच्या या प्रोजेक्टचं ती प्रमोशन करत होती. लखनौच्या सुशांत गोल्फ सिटी सेक्टर – १ पॉकेट डीमध्ये फ्लॅट बांधले जात असल्याची माहिती गौरीने जाहिरातीच्या माध्यमातून दिली होती. त्यावेळी २०१६ मध्ये पझेशन मिळेल असे सांगण्यात आले होते. पण पूर्ण पैसे घेतल्यानंतरही त्यांना अद्याप फ्लॅटची चावी मिळालेली नाही.