उद्योगपती अनिल अंबानी यांच्यानंतर मंगळवार, ४ जुलै रोजी त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांची चौकशी होणार आहे. चौकशीला सामोरे जाण्यासाठी त्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात पोहचल्या आहेत. सोमवार, ३ जुलै रोजी ईडीने फेमा प्रकरणात अनिल अंबानी यांचा जबाब नोंदवला आहे. यानंतर टीना अंबानी यांची देखील चौकशी करण्यात येत आहे.
उद्योगपती अनिल अंबानी यांची फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. अनिल अंबानी सोमवारी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात पोहचले होते. येस बँकेच्या कर्ज प्रकरणात बँकेचे सह- संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आलेल्या प्रकरणात अनिल अंबानी यापूर्वी २०२० मध्ये ईडीसमोर हजर झाले होते.
Tina Ambani, wife of Reliance ADA Group Chairman Anil Ambani, appears before ED in Mumbai for questioning in FEMA case: Officials
— Press Trust of India (@PTI_News) July 4, 2023
हे ही वाचा:
२०२४ नव्हे २०४७ हे आपले उद्दीष्ट
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अमेरिकेत १० हजार जणांचं सामूहिक भगवद्गीता पठण
७ जुलैपासून ९९९ रुपयांत जीओ भारत फोन
अमेरिकन गायिका मिलबेन राहुल गांधींवर उखडल्या
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने ४२० कोटी रुपयांच्या करचोरी प्रकरणात अंबानी यांना दिलासा दिला होता. तसेच आयकर विभागाला अनिल अंबानींवर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये असे सांगितले होते. मार्च २०२० मध्ये, अनिल अंबानी यांना ईडीने येस बँकेच्या एक्सपोजरच्या संदर्भात चौकशी केली होती. रिलायन्स समूहाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, अंबानी यांनी ईडी अधिकाऱ्यांना सांगितले होते की, ADAG आणि येस बँक यांच्यातील सर्व व्यवहारांमध्ये कायद्याचे आणि आर्थिक नियमांचे पालन केले आहे. टीना अंबानी यांच्या चौकशीनंतर कोणती माहिती समोर येणार याकडे लक्ष असणार आहे.